Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 562

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- वसुर्भारद्वाजः Chhand- जगती Swara- निषादः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
अ꣡सा꣢वि꣣ सो꣡मो꣢ अरु꣣षो꣢꣫ वृषा꣣ ह꣢री꣣ रा꣡जे꣢व द꣣स्मो꣢ अ꣣भि꣡ गा अ꣢꣯चिक्रदत् । पु꣣नानो꣢꣫ वार꣣म꣡त्ये꣢ष्य꣣व्य꣡य꣢ꣳ श्ये꣣नो꣡ न योनिं꣢꣯ घृ꣣त꣡व꣢न्त꣣मा꣡स꣢दत् ॥५६२॥

अ꣡सा꣢꣯वि । सो꣡मः꣢꣯ । अ꣣रुषः꣢ । वृ꣡षा꣢꣯ । ह꣡रिः꣢꣯ । रा꣡जा꣢꣯ । इ꣣व । दस्मः꣢ । अ꣣भि꣢ । गाः । अ꣣चिक्रदत् । पुनानः꣢ । वा꣡र꣢꣯म् । अ꣡ति꣢꣯ । ए꣣षि । अव्य꣡य꣢म् । श्ये꣣नः꣢ । न । यो꣡नि꣢꣯म् । घृ꣣त꣡व꣢न्तम् । आ । अ꣣सदत् ॥५६२॥

Mantra without Swara
असावि सोमो अरुषो वृषा हरी राजेव दस्मो अभि गा अचिक्रदत् । पुनानो वारमत्येष्यव्ययꣳ श्येनो न योनिं घृतवन्तमासदत् ॥

असावि । सोमः । अरुषः । वृषा । हरिः । राजा । इव । दस्मः । अभि । गाः । अचिक्रदत् । पुनानः । वारम् । अति । एषि । अव्ययम् । श्येनः । न । योनिम् । घृतवन्तम् । आ । असदत् ॥५६२॥

Samveda - Mantra Number : 562
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 2; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 9;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(अरुषः) तेजोमय (वृषा) सुख आदीची वृष्टि करणाऱ्या तसेच (हरिः) पाप आदी दुष्ट विचारांना, कर्मांना दूर करणाऱ्या (सोमः) आनंद-रसाचा भांडार असणाऱ्या त्या परमेश्वराला मी (असावि) आपल्या हृदयात अभिषुत (जागृत) केले आहे त्यापासून येणारा आनंद अनुभवीत आहे. (दस्मः) दर्शनीय वा दुर्गुण-संहारक तो परमेश्वर (राजा इव) राजा ज्याप्रमाणे (गाःअभि) भूमीला म्हणजे भूमिवासीजनांना उद्देशून (अधिक्रदत्) उपदेश करतो राज्य-कारभाराचे नियम घोषित करतो, तसेच तो परमेश्वर (गाःअभि) स्तोताजनांना उद्देशून (अचिक्रदत्) उपदेश करीत आहे. हे परमात्मा, (पुनानः) आम्हास पवित्र करीत आपण (वारम्) निवारक वा उपासनेत बाधक असणाऱ्या काम-क्रोधादींना (अति) अतिक्रमित करीत (अव्ययम्) अविनाशी जीवात्म्याला (एषि) प्राप्त होता. (पूदेनःन) जसे वायू (घृतवन्तम्) जलयुक्त (योनिम्) अंतरिक्षात (आसदत्) येऊन स्थित आहे, तद्वत परमेश्वर (घृतवन्तम्) तूप, जल, दीप्ती आदींनी युक्त (योनिम्) ब्रह्मांडरूप घरात (आसदत्) स्थित होतो.।।९।।
Essence
आधीपासूनच सर्वांच्या हृदयात असणाऱ्या, गुप्त रूपेण तिथे राहणाऱ्या परमेश्वराचा सर्वांनी श्रवण, मनन, निदिध्यासन आदीद्वारे साक्षात्कार केला पाहिजे.।।९।।
Subject
परमेश्वराकडून वाहत देणाऱ्या आनंद-रसाचे वर्णन
Special
या मंत्रात श्लिष्टोपमा अलंकार आहे. ।।९।।