Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 558

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- कविर्भार्गवः Chhand- जगती Swara- निषादः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
ध꣣र्ता꣢ दि꣣वः꣡ प꣢वते꣣ कृ꣢त्व्यो꣣ र꣢सो꣣ द꣡क्षो꣢ दे꣣वा꣡ना꣢मनु꣣मा꣢द्यो꣣ नृ꣡भिः꣢ । ह꣡रिः꣢ सृजा꣣नो꣢꣫ अत्यो꣣ न꣡ सत्व꣢꣯भि꣣र्वृ꣢था꣣ पा꣡जा꣢ꣳसि कृणुषे न꣣दी꣢ष्वा ॥५५८॥

ध꣣र्ता꣢ । दि꣣वः꣢ । प꣣वते । कृ꣡त्व्यः꣢꣯ । र꣡सः꣢꣯ । द꣡क्षः꣢꣯ । दे꣣वा꣡ना꣢म् । अ꣣नुमा꣡द्यः꣢ । अ꣣नु । मा꣡द्यः꣢꣯ । नृ꣡भिः꣢꣯ । ह꣡रिः꣢꣯ । सृ꣣जानः꣢ । अ꣡त्यः꣢꣯ । न । स꣡त्व꣢꣯भिः । वृ꣡था꣢꣯ । पा꣡जाँ꣢꣯सि । कृ꣣णुषे । नदी꣡षु꣢ । आ ॥५५८॥

Mantra without Swara
धर्ता दिवः पवते कृत्व्यो रसो दक्षो देवानामनुमाद्यो नृभिः । हरिः सृजानो अत्यो न सत्वभिर्वृथा पाजाꣳसि कृणुषे नदीष्वा ॥

धर्ता । दिवः । पवते । कृत्व्यः । रसः । दक्षः । देवानाम् । अनुमाद्यः । अनु । माद्यः । नृभिः । हरिः । सृजानः । अत्यः । न । सत्वभिः । वृथा । पाजाँसि । कृणुषे । नदीषु । आ ॥५५८॥

Samveda - Mantra Number : 558
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 2; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 9;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(दिवः) घुलोकास म्हणजे सूर्यास (धर्ता) धारण करणारा (कृत्यः) कर्मकुशल (रसः) आनंद-रसमव तसेच (देवानाम्) विद्वानांना (दक्षः) शक्ती प्रदाना करणारा आणि (नृभिः अनुमाद्य.) पुरुषार्थी मनुष्यांनी ज्यास प्रसन्न करणे उचित आहे, अशा तो परमेश्वर (पवते) सर्व जढ-चेतन जगाला पवित्र करतो. यापुढे प्रत्यक्ष स्तुती करीत म्हटले आहे- (हरिः) हे प्रभो आपण सूर्य, चंद्र, पृथ्वी आदींचे आकर्षण शक्तीद्वारे नियमन करणारे, (सृजानः) जगाची रचना करणारे, (वृथा). सहजच (सत्वभिः) आपल्या शक्तीने (नदीषु) नद्यांमधे (पाजांसि) बळ व वेग (आक्रणुषे) स्थापित करणारे आहात. (अत्यःन) जसे घोडा रथाला वेग देतो, तसे हे प्रभो, आपण जगाची रचना व धारणा व संचालन करीत आहात।।५।।
Essence
जो परमेश्वर समस्त जगाचा रचयिता, धारणकर्ता आणि बळ व वेग आदी शक्ती देणारा आहे. त्याची सर्व मनुष्यांनी आराधना का बरे करू नये अर्थात अवश्य करावी.।।५।।
Subject
सोम परमेश्वराच्या कर्मांचे वर्णन
Special
या मंत्रात लक्षणावृत्तीने ‘रस’ शब्दाचा ‘रसवान’ आणि ‘दक्ष’चा ‘दक्षकारी’ अर्थ ग्रहण केला पाहिजे. ‘अत्योनः?मध्ये उपमा अलंकार आहे.।।५।।