Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 550

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- रेभसूनू काश्यपौ Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
अ꣣भी꣡ न꣢वन्ते अ꣣द्रु꣡हः꣢ प्रि꣣य꣡मिन्द्र꣢꣯स्य꣣ का꣡म्य꣢म् । व꣣त्सं꣢꣫ न पूर्व꣣ आ꣡यु꣢नि जा꣣त꣡ꣳ रि꣢हन्ति मा꣣त꣡रः꣢ ॥५५०॥

अ꣣भि꣢ । न꣣वन्ते । अद्रु꣡हः꣢ । अ꣣ । द्रु꣡हः꣢꣯ । प्रि꣣य꣢म् । इ꣡न्द्र꣢꣯स्य । का꣡म्य꣢꣯म् । व꣣त्स꣢म् । न । पू꣡र्वे꣢꣯ । आ꣡यु꣢꣯नि । जा꣣त꣢म् । रि꣣हन्ति । मात꣡रः꣢ ॥५५०॥

Mantra without Swara
अभी नवन्ते अद्रुहः प्रियमिन्द्रस्य काम्यम् । वत्सं न पूर्व आयुनि जातꣳ रिहन्ति मातरः ॥

अभि । नवन्ते । अद्रुहः । अ । द्रुहः । प्रियम् । इन्द्रस्य । काम्यम् । वत्सम् । न । पूर्वे । आयुनि । जातम् । रिहन्ति । मातरः ॥५५०॥

Samveda - Mantra Number : 550
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 2; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 8;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(अद्रुहः द्रोहन करणाऱ्या, नव्हे नव्हे (लेकराला) (वासराला) अत्यंत प्रेम करणाऱ्या (मातरः) आईप्रमाणे/गाईप्रमाणे असलेल्या मनुष्याच्या मनोवृत्ती (प्रियम्) आपल्या प्रिय (इन्द्रस्य) आत्म्याच्या (काम्यम्) प्रिय कमनीय परमेश्वरा (अभि)कडे (नवन्ते) जातात (हृदय सहजच ईश्वरीय प्रेमाकडे, भक्तीकडे आकर्षित होते) आणि जसे गाय आपल्या (जातम्) नवजात वासराला (रिहन्ति) प्रेमाने चाटते तसे मनोवृत्ती परमेश्वराशी संपर्क करतात. (जातम्) उत्पन्न (वस्तम्) वासराला (ज) ज्याप्रकारे (मातरः) गायी (पूर्वे आयुनि) प्रथम प्रथम अवस्थेत म्हणजे त्याचा जन्म झाल्याबरोबर वासराला (रिहन्ति) चाटतात, तसेच मनोवृत्ती सहजच ईश्वराकडे धाव घेतात ।।६।।
Essence
ज्याप्रमाणे गायी आपापल्या नवजात वासराला प्रेमाने चाटतात, तसेच मनोवृत्ती हृदयात प्रादुर्भूत परमेश्वराचा अत्यंत आनंदाने आस्वाद घेतात. ।।६।।
Subject
मनोवृत्ती परमेश्वराच्या आनंदाचा उपभोग कशा प्रकारे घेतात -
Special
या मंत्रात श्लिष्टोपमा अलंकार आहे. चाटणे ही क्रिया जिव्हेद्वारे होत असते, ते मनोवृत्ती पक्षी घटित होत नाही, त्यामुळे येथे लक्षणा शब्दशक्तीद्वारे संसर्ग वा संपर्क अर्थ द्यावा लागतो. अथवा येथे सामीप्याचा आत्यंतिक व्यंग्यभाव बोधित होतो. गौ-पक्षीं जिव्हेने चाटणे संभव नसल्यामुळे लक्षणाशक्ती संभवत नाही ।।६।।