Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 538

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- नोधा गौतमः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
सा꣣कमु꣡क्षो꣢ मर्जयन्त꣣ स्व꣡सा꣢रो꣣ द꣢श꣣ धी꣡र꣢स्य धी꣣त꣢यो꣣ ध꣡नु꣢त्रीः । ह꣢रिः꣣ प꣡र्य꣢द्रव꣣ज्जाः꣡ सूर्य꣢꣯स्य꣣ द्रो꣡णं꣢ ननक्षे꣣ अ꣢त्यो꣣ न꣢ वा꣣जी꣢ ॥५३८॥

सा꣣कमु꣡क्षः꣢ । सा꣣कम् । उ꣡क्षः꣢꣯ । म꣣र्जयन्त । स्व꣡सा꣢꣯रः । द꣡श꣢꣯ । धी꣡र꣢꣯स्य । धी꣣त꣡यः꣢ । ध꣡नु꣢꣯त्रीः । ह꣡रिः꣢꣯ । प꣡रि꣢꣯ । अ꣣द्रवत् । जाः꣢ । सू꣡र्य꣢꣯स्य । सु । ऊ꣣र्यस्य । द्रो꣡णं꣢꣯ । न꣣नक्षे । अ꣡त्यः꣢꣯ । न । वा꣣जी꣢ ॥५३८॥

Mantra without Swara
साकमुक्षो मर्जयन्त स्वसारो दश धीरस्य धीतयो धनुत्रीः । हरिः पर्यद्रवज्जाः सूर्यस्य द्रोणं ननक्षे अत्यो न वाजी ॥

साकमुक्षः । साकम् । उक्षः । मर्जयन्त । स्वसारः । दश । धीरस्य । धीतयः । धनुत्रीः । हरिः । परि । अद्रवत् । जाः । सूर्यस्य । सु । ऊर्यस्य । द्रोणं । ननक्षे । अत्यः । न । वाजी ॥५३८॥

Samveda - Mantra Number : 538
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 1; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 7;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(प्रथम अर्थ) (सोम औषधीपर) - (धीरस्य) बुद्धिमंत यजमानाच्या (साकमुक्षः) सोबत सोमरस गाळणारा (धनुत्री) प्रेरक (दश) दहा (धीतयः) बोटे जेव्हा सोमरस (मर्जमन्ति) शुद्ध करतात, तेव्हा (सूर्यस्य) सूर्याचा (जाः) पुत्र (हरिः) हिरव्या रंगाचा सोमरस (पर्यद्रवत्) चारही दिशांकडे पसरतो. (न) ज्याप्रमाणे (वाजी) वेगवान (अत्यः) घोडा (द्रोणम्) काष्ठनिर्मित रथाला (नवक्षे) ओढथो वा जुंपला जातो, तसेच सोमरस (द्रोणम्) द्रोण कलशात (ननक्षे) एकत्रित होतो.।।
द्वितीय अर्थ - (परमात्मपर) (धीरस्य) एका ध्यानावस्थित योगी पुरुषासह (साकमुक्षः) मिळून ज्ञान आणि कर्माद्वारे सिंचन करणाऱ्या (स्वसारः) आणि बहिणीप्रमाणए एकमेकाने साह्य करणाऱ्या (धनुत्रीः) प्रेरक (दश) दहा (धीतयः) यम व नियम या दहा धारणा जेव्हा (मर्जयन्त) आत्म्यास शुद्ध करतात, तेव्हा (सूर्यस्य) परमेश्वराचा (जाः) पुत्र म्हणजे (हरिः) उन्नतीच्या मार्गावर जाणारा आत्मा (पर्यद्रवत्) क्रियाशील होतो. (न) जसे (वाजी) वेगवान (अत्यः) घोडा (द्रोणम्) काष्ठनिर्मित रथाला (नवक्षे) प्राप्त करतो म्हणजे जुंपला जातो, तसे तो आत्मा (द्रोणम्) क्रियाशीसल परमात्म रूप द्रोण कलशाला (नवक्षे) प्राप्त करतो (आत्म्याशी संयुक्त करतो.)।। ६।।
Essence
अंगुली समूहाद्वारे शुद्ध केलेला सोमरस जसे द्रोण कलशाकडे जातो, तसेच यम- नियमांच्या भावनांनी परिशुद्ध झालेला जीवात्मा परमात्म्यास प्राप्त करतो.।। ६।।
Subject
जीवात्मा परमात्म्याला केव्हा प्राप्त करतो, याविषयी -
Special
या मंत्रात श्लेष अलंकार आहे. ‘द्रोणं नवक्षे अत्यो न वाजी’ या कथनात श्लिष्टोपमा आहे. ‘स’ ‘घ’ ‘न’ आणि ‘र’ या अक्षरांच्या अनेक वेळा आवृत्ती असल्यामुळे वृत्त्यनुप्रास अलंकार आहे.।। ६।।