Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 533

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- प्रतर्दनो दैवोदासिः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
प्र꣡ से꣢ना꣣नीः꣢꣫ शूरो꣣ अ꣢ग्रे꣣ र꣡था꣢नां ग꣣व्य꣡न्ने꣢ति꣣ ह꣡र्ष꣢ते अस्य꣣ से꣡ना꣢ । भ꣣द्रा꣢न्कृ꣣ण्व꣡न्नि꣢न्द्रह꣣वा꣡न्त्सखि꣢꣯भ्य꣣ आ꣢꣯ सोमो꣣ व꣡स्त्रा꣢ रभ꣣सा꣡नि꣢ दत्ते ॥५३३॥

प्र꣢ । से꣣नानीः꣢ । से꣣ना । नीः꣢ । शू꣡रः꣢꣯ । अ꣢ग्रे꣣ । र꣡था꣢꣯नाम् । ग꣣व्य꣢न् । ए꣣ति । ह꣡र्ष꣢꣯ते । अ꣣स्य । से꣡ना꣢꣯ । भ꣣द्रा꣢न् । कृ꣣ण्व꣢न् । इ꣣न्द्रहवा꣢न् । इ꣣न्द्र । हवा꣢न् । स꣡खि꣢꣯भ्यः । स । खि꣣भ्यः । आ꣢ । सो꣡मः꣢꣯ । व꣡स्त्रा꣢꣯ । र꣣भसा꣡नि꣢ । द꣣त्ते ॥५३३॥

Mantra without Swara
प्र सेनानीः शूरो अग्रे रथानां गव्यन्नेति हर्षते अस्य सेना । भद्रान्कृण्वन्निन्द्रहवान्त्सखिभ्य आ सोमो वस्त्रा रभसानि दत्ते ॥

प्र । सेनानीः । सेना । नीः । शूरः । अग्रे । रथानाम् । गव्यन् । एति । हर्षते । अस्य । सेना । भद्रान् । कृण्वन् । इन्द्रहवान् । इन्द्र । हवान् । सखिभ्यः । स । खिभ्यः । आ । सोमः । वस्त्रा । रभसानि । दत्ते ॥५३३॥

Samveda - Mantra Number : 533
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 1; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 7;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(सेनानीः) देवजनांचा सेनापती (शूरः) शूरवीर सोम नाम परमेश्वर (गव्यन्) दिव्य प्रकाशाची (सैनिकांप्रमाणे उपासकांना प्रेरणा देत) (रथानाम्) शरीर - रथावर आरूढ जीवात्मारूप योद्धाजनांच्या (अग्रे) पुढे (अग्रस्थानी) (प्र एति) चालतो. यामुळे (अस्य) या सेनापतीची (सेना) देवसेना (हर्षते) प्रमुदित व अत्युत्साहित होते. (सखिभ्यः) त्याचे मित्रवत जे उपासक गण, त्यानी (उन्द्र हवान्) आपल्या सेनापतीला केलेले आवाहन वा दिलेली हाक तो परमेश्वर रूप सेनापती (भद्रान्) भध्र (कृण्वन्) करीत (सैनिकांच्या / उपासकांच्या हाका ऐकत) (सोमः) वीररस पूर्ण तो परमेश्वर (रभसानि) बळ, वेग आदी गुण (वस्त्रा) जसा कोणी झटपट वस्त्र नेमतो तद्वत बळ, वेगादी (आदत्ते) धारण करतो. म्हणजे जसे कोणी वस्त्र धारण करतो, तसा तो वीर परमेश्वर आपल्या सेनापतितवा नेतृत्वाची पूर्तता करण्यासाठी शक्ती व वेग धारण करतो.।। १।।
Essence
जसे एक शूर सेनापती वीरोचित वस्त्रे धारण करून रथारोही सैनिकांच्या पुढे पुढे चालत त्यांचा उत्साह वाढवत असतो आणि आपल्या सैन्याला हर्षित करतो, तसेच परमेश्वरदखील वीरोचित शक्ती, वेग आदी धारण करीत (उत्पत्ती, कर्मफल प्रदान संचालन आदीविषयी त्वरित कार्य करीत उपासकांच्या मानसिक देवासुर - संग्रामामध्ये त्यांचासेनानी होऊन दिर्विचाररूप शत्रूंचा संहार करण्यासाठी व दिव्य विचारांच्या वृद्धीकरिता देवजनांना समुत्साहित करतो.।। १।।
Subject
परमेश्वराचे सेनानी रूपाने वर्णन
Special
या मंत्रातला रस वीर रस आहे. सोम परमेश्वरावर सेनापतीचा आरोप असल्यामुळे रूपक अलंकार आहे.।। १।।