Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 531

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- उशना काव्यः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
ए꣣ष꣢꣫ स्य ते꣣ म꣡धु꣢माꣳ इन्द्र꣣ सो꣢मो꣣ वृ꣢षा꣣ वृ꣢ष्णः꣣ प꣡रि꣢ प꣣वि꣡त्रे꣢ अक्षाः । स꣣हस्रदाः꣡ श꣢त꣣दा꣡ भू꣢रि꣣दा꣡वा꣢ शश्वत्त꣣मं꣢ ब꣣र्हि꣢꣫रा वा꣣꣬ज्य꣢꣯स्थात् ॥५३१॥

ए꣣षः꣢ । स्यः । ते꣣ । म꣡धु꣢꣯मान् । इ꣣न्द्र । सो꣡मः꣢꣯ । वृ꣡षा꣢꣯ । वृ꣡ष्णः꣢꣯ । प꣡रि꣢꣯ । प꣣वि꣡त्रे꣢ । अ꣣क्षारि꣡ति꣢ । स꣣हस्रदाः꣢ । स꣣हस्र । दाः꣢ । श꣣तदाः꣢ । श꣣त । दाः꣢ । भू꣣रिदा꣡वा꣢ । भू꣣रि । दा꣡वा꣢꣯ । श꣣श्वत्तम꣢म् । ब꣣र्हिः꣢ । आ । वा꣣जी꣢ । अ꣣स्थात् ॥५३१॥

Mantra without Swara
एष स्य ते मधुमाꣳ इन्द्र सोमो वृषा वृष्णः परि पवित्रे अक्षाः । सहस्रदाः शतदा भूरिदावा शश्वत्तमं बर्हिरा वाज्यस्थात् ॥

एषः । स्यः । ते । मधुमान् । इन्द्र । सोमः । वृषा । वृष्णः । परि । पवित्रे । अक्षारिति । सहस्रदाः । सहस्र । दाः । शतदाः । शत । दाः । भूरिदावा । भूरि । दावा । शश्वत्तमम् । बर्हिः । आ । वाजी । अस्थात् ॥५३१॥

Samveda - Mantra Number : 531
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 1; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 6;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (इन्द्र) परमैश्वर्यवान परमेश्वर, (वृष्णा) तुझ्यासारख्या वृष्टीकारकाला (एषः) हा (स्यः) तो प्रख्यात (वृषा) आणि शक्तिवर्धक व (मधुमान्) मधुर (सोमः) आनंद रस (पवित्रे) माझ्या पवित्र हृदयरूप द्रोण कलशात (परि अक्षाः) गळत वा झिरपत आहे. (सहस्रदाः) सहस्र गुण- प्रदाता, (शतयाः) शंभर शक्ती - प्रदाता, (भूरिदावा) अनेक लाभ देणारा आणि (वाजी) वेगवान तो तुझा आनंद रस (शश्वत्तमम्) सनातन (बर्हिः) आत्मारूप दर्भ पात्रात (आ अस्यात्) येऊन स्थित झाला आहे. (मी निरंतर सतत तुझ्या भक्तिरसाचा आनंद अनुभवत आहे.)।। ९।।
Essence
जसे मधुर रकाने भरलेला सोम पवित्र द्रोण कलशात क्षरित होतो (टपकतो वा धारेच्या रूपाने खाली पडतो) तसेच परमेश्वराचा मधुर आनंद रस हृदय रूप द्रोणकलशात धारा रूपाने पडतो. सोम रस जसा बहुशक्तिप्रद आहे. तद्वत आनंद रसदेखील अति शक्तिदायक आहे.।। ९।।
Subject
परमात्म्याकडून मिळणाऱ्या आनंद रसाचे वर्णन
Special
या मंत्रात ‘तुझ वृषाचा रसही वृषा आहे’ या कथनात उचित समागम असल्यामुळे समालंकार ध्वनित होत आहे. ‘वृषा, वृष’ यामध्ये छेकानुप्रास आहे. ‘दा’ची तीन वेळा आवृत्ती होत असल्यामुळे येथे वृत्त्यनुप्रासही आहे.।। ९।।