Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 52

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- मेधातिथि0मेध्यातिथी काण्वौ Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
अ꣢ध꣣ ज्मो꣡ अध꣢꣯ वा दि꣣वो꣡ बृ꣢ह꣣तो꣡ रो꣢च꣣ना꣡दधि꣢꣯ । अ꣣या꣡ व꣢र्धस्व त꣣꣬न्वा꣢꣯ गि꣣रा꣢꣫ ममा जा꣣ता꣡ सु꣢क्रतो पृण ॥५२॥

अ꣡ध꣢꣯ । ज्मः । अ꣡ध꣢꣯ । वा꣣ । दिवः꣢ । बृ꣣हतः꣢ । रो꣣चना꣢त् । अधि꣢꣯ । अ꣣या꣢ । व꣣र्धस्व । त꣡न्वा꣢꣯ । गि꣣रा꣢ । म꣡म꣢꣯ । आ । जा꣣ता꣢ । सु꣢क्रतो । सु । क्रतो पृण ॥५२॥

Mantra without Swara
अध ज्मो अध वा दिवो बृहतो रोचनादधि । अया वर्धस्व तन्वा गिरा ममा जाता सुक्रतो पृण ॥

अध । ज्मः । अध । वा । दिवः । बृहतः । रोचनात् । अधि । अया । वर्धस्व । तन्वा । गिरा । मम । आ । जाता । सुक्रतो । सु । क्रतो पृण ॥५२॥

Samveda - Mantra Number : 52
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 5;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(अध) आणखी (ही याचना) की हे इन्द्र परमात्मन् आपण (ज्म:) पृथ्वी लोकातील (अध वा) आणि (दिव:) भुलोकातून तसेच (वढहत) महान (रोचनाद अधि) दीप्त चंद्रलोक अथवा अंतरिक्ष लोकातून तेथील त्या त्या वस्तू आणून आम्हाला (आ पृण) परिपूर्ण वा संपन्न करा. या कथनाचा आशय हा की पृथ्वी, द्यौ अंतरिक्ष या लोकात अग्नी, वायू, प्रकाश, औषधी, वनस्पती, पुष्य, मूळ, स्वर्ण, रजत, मणी, मोती आदी जे पदार्थ आहेत ते आम्हा उपासकांना मुक्त हस्ते प्रदान करा. आपण (मम) माझ्या (अया) या (तन्वा) स्तुतिवाणीने (वर्धस्व) माझ्या अंत:करणात वृद्धिंगत व्हा. (सुक्रतो) उत्कृष्ट प्रज्ञावान आणि उत्कृष्ट कर्मवान हे प्रभो, आपण (जात) उत्पन्न संतानांना (आमच्या मुलामुलींना अथवा सर्व मनुष्य तुमचीच संताने म्हणून सर्वांना) (आ पृण) प्रज्ञा, सत्कर्म आणि संपदेने तृप्त करा. ।।८।।
Essence
भूलोकावर जे पर्वत, नदी, नद, सागर, वृक्ष, वनस्पती, लता, पत्र, पुष्प आदीमध्ये तसेच द्युलोकातील नक्षत्रे आकाशगंगा सूर्य किरणे आदीमध्ये आणि अंतरिक्ष लोकातील चंद्रमा, वायू, मेघ आदीमध्ये जे जे ऐश्वर्य आहे, परमेश्वर ते सर्व ऐश्वर्य सर्वांना नि:शुल्क देत आहे. यामुळे आम्ही आपल्या वाणीने त्याचा महिमा वर्णित करणारे गीत गायिले पाहिजेत. ।।८।।
Subject
पुढील मंत्रात परमेश्वराला प्रार्थना केली आहे. -