Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 504

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- कश्यपो मारीचः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
वृ꣡षा꣢ सोम द्यु꣣मा꣡ꣳ अ꣢सि꣣ वृ꣡षा꣢ देव꣣ वृ꣡ष꣢व्रतः । वृ꣡षा꣣ ध꣡र्मा꣢णि दध्रिषे ॥५०४॥

वृ꣡षा꣢꣯ । सो꣣म । द्युमा꣢न् । अ꣣सि । वृ꣡षा꣢꣯ । दे꣣व । वृ꣡ष꣢꣯व्रतः । वृ꣡ष꣢꣯ । व्र꣣तः । वृ꣡षा꣢꣯ । ध꣡र्मा꣢꣯णि । द꣣ध्रिषे ॥५०४॥

Mantra without Swara
वृषा सोम द्युमाꣳ असि वृषा देव वृषव्रतः । वृषा धर्माणि दध्रिषे ॥

वृषा । सोम । द्युमान् । असि । वृषा । देव । वृषव्रतः । वृष । व्रतः । वृषा । धर्माणि । दध्रिषे ॥५०४॥

Samveda - Mantra Number : 504
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 1; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 4;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(सोम) रसनिधी परमेश्वरा, (द्युमान्) तू तेजस्वी आहेस (वृषा) तेज - वर्षक सूर्याप्रमाणे (असि) आहेस. (देव) दान आदी गुणांनी विभूषित हे जगदीश्वरा, (वृषव्रतः) तू सद्गुणांची वृष्टी करणारा आहेस. (वृषा) तूच सद्गुणांची वृष्टी करणाऱ्या मेघाप्रमाणे आहेस. (वृषा) धर्माची वर्षा करणारा तू (धर्माणि) धर्म, कर्मादींना (दध्रिषे) धारण करणारा आहेस (अर्थात सृष्टी - संचालनाचे नियम, कर्म फलप्रदानादी कर्म करणारा केवळ तूच आहेस.)।। ८।।
Essence
उपासना केल्याने परमेश्वर सूर्य व मेघाप्रमाणे वर्षक होऊन धन, धर्म, तेज, शांती, सुख आदींची वृष्टी करून उपासकाला कृतार्थ करतो.।। ८।।
Subject
सोम परमेश्वराला वा वानप्रस्थाला आवाहन
Special
या मंत्रात ङ्गवृषाफच्या आवृत्तीमुळे यमक अलंकार आहेस. ङ्गवृषा असिफमध्ये लुप्तोपमा आहे.।। ८।।