Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 502

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- असितः काश्यपो देवलो वा Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
अ꣡नु꣢ प्र꣣त्ना꣡स꣢ आ꣣य꣡वः꣢ प꣣दं꣡ नवी꣢꣯यो अक्रमुः । रु꣣चे꣡ ज꣢नन्त꣣ सू꣡र्य꣢म् ॥५०२॥

अ꣡नु꣢꣯ । प्र꣣त्ना꣡सः꣢ । आ꣣य꣡वः꣢ । प꣣द꣢꣯म् । न꣡वी꣢꣯यः । अ꣣क्रमुः । रुचे꣢ । ज꣣नन्त । सू꣡र्य꣢꣯म् ॥५०२॥

Mantra without Swara
अनु प्रत्नास आयवः पदं नवीयो अक्रमुः । रुचे जनन्त सूर्यम् ॥

अनु । प्रत्नासः । आयवः । पदम् । नवीयः । अक्रमुः । रुचे । जनन्त । सूर्यम् ॥५०२॥

Samveda - Mantra Number : 502
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 1; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 4;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
सोम परमेश्वराच्या साह्याने (प्रत्नासः) ज्ञानाच्या दृष्टीने पुरातन मनुष्य म्हणजे वयोवृहृजन (नवीयः) नवीनतर (पदम्) राजमंत्री, न्यायाधीश आदी पद अथवा मोक्षपद (अनु अक्रमुः) अनुकूलतेने प्राप्त करतात आणि ते (रूचे) प्रकाशासाठी (सूर्यम्) विद्येच्या वा अध्यात्म्याच्या सूर्याला (जनन्त) प्रकट करतात. (अथवा असा अर्थही होतो की (नवीयः) नवीन तरुण (प्रत्नासः) पुरातन वा महत्त्वाच्या जबाबदारीचे (पदम्) पद प्रयत्नाने प्राप्त करतात आणि (रूचे) यासाठी आपल्यातील प्रकाश, गुण व पात्रता सूर्याप्रमाणे प्रकाशित करतात.)।। ६।।
Essence
परमेश्वराची कृपा व स्वतः केलेला पुरुषार्थ, याद्वारे मनुष्य गण सांसारिक सर्वोच्च पददेखील प्राप्त करू शकतात आणि मोक्षसिद्धीही करू शकतात. शिवाय राष्ट्रात व जगात मनुष्य गण ज्ञान - विज्ञान आणि सदाचार रूप सूर्याचा प्रकाश सर्वत्र विस्तारू शकतात.।। ६।।
Subject
सोम परमेश्वराच्या साह्याने लोकांना काय काय मिळते, याविषयी -
Special
या मंत्रातील ‘वृद्धी जीर्ण लोक नवीन पद प्राप्त करतात’ या कथनात नवीन पदाच्या प्राप्तीचे कारण उपस्थित नसतानाही त्याची प्राप्ती दाखविली आहे. त्यामुळे येथे विभावना अलंकार ध्वनित होत आहे. तसेच ‘मनुष्य सूर्याला उत्पन्न करतात’ अध्यात्म - प्रकाश’ वा ‘विद्या - प्रकाश’ उत्पन्न करतात’ असा लक्ष्यार्थ घ्यावा लागत आहे.।। ६।।