Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 5

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- उशना काव्यः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
प्रे꣡ष्ठं꣢ वो꣣ अ꣡ति꣢थिꣳ स्तु꣣षे꣢ मि꣣त्र꣡मि꣢व प्रि꣣य꣢म् । अ꣢ग्ने꣣ र꣢थं꣣ न꣡ वेद्य꣢꣯म् ॥५॥

प्रे꣡ष्ठ꣢꣯म् । वः꣣ । अ꣡ति꣢꣯थिम् । स्तु꣣षे꣢ । मि꣣त्र꣢म् । मि꣣ । त्र꣢म् । इ꣣व । प्रिय꣢म् । अ꣡ग्ने꣢꣯ । र꣡थ꣢꣯म् । न । वे꣡द्य꣢꣯म् ॥५॥

Mantra without Swara
प्रेष्ठं वो अतिथिꣳ स्तुषे मित्रमिव प्रियम् । अग्ने रथं न वेद्यम् ॥

प्रेष्ठम् । वः । अतिथिम् । स्तुषे । मित्रम् । मि । त्रम् । इव । प्रियम् । अग्ने । रथम् । न । वेद्यम् ॥५॥

Samveda - Mantra Number : 5
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 1;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (अग्ने) अग्रणी परमात्मन् (श्रेष्ठम्) सर्वाधिक प्रिय अतिथी (अतिथिम्) अतिथिप्रमाणे असलेल्या तसेच (मित्रम् इव) मित्राप्रमाणे (प्रिय) असलेल्या तसेच (रथं न) रथाप्रमाणे (वेद्यम्) प्राप्तव्य असलेल्या (व:) आपली मी (स्तुषे) स्तुती करतो. ।।५।। या मंत्रात मित्रम् इव आणि रथं च या शब्दात उपमा अलंकार आहे. ।।५।।
Essence
जसा मित्र सर्वांना प्रिय असतो, परमात्मादेखील तसाच उपासकांना प्रिय वाटतो, जसे एक रथ गन्तव्य स्थानाकडे जाण्यासाठी प्राप्तव्य असतो, तसेच प्रेयमार्ग व श्रेय मार्गाच्या लक्ष्यापर्यंत म्हणजे ऐहिक आणि पारलौकिक उत्कर्ष प्राप्तीसाठी सर्वांनी परमात्म्याची प्राप्ती व स्तुती केली पाहिजे. आपल्या हृदयप्रदेशात विद्यमान परमात्मा प्रत्यक्ष आपल्या घरात आलेला सर्वाधिक प्रिय अतिथी आहे. म्हणूनच त्याचा अतिथिप्रमाणे सत्कार केला पाहिजे. (हृदयात त्याचे ध्यान केले पाहिजे.) ।।५।।