Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 499

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- उचथ्य आङ्गिरसः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
अ꣡ध्व꣢र्यो꣣ अ꣡द्रि꣢भिः सु꣣त꣡ꣳ सोमं꣢꣯ प꣣वि꣢त्र꣣ आ꣡ न꣢य । पु꣣नाही꣡न्द्रा꣢य꣣ पा꣡त꣢वे ॥४९९॥

अ꣡ध्व꣢꣯र्यो । अ꣡द्रि꣢꣯भिः । अ । द्रि꣣भिः । सुत꣢म् । सो꣡म꣢꣯म् । प꣣वि꣡त्रे꣢ । आ । न꣣य । पुनाहि꣢ । इ꣡न्द्रा꣢꣯य । पा꣡त꣢꣯वे ॥४९९॥

Mantra without Swara
अध्वर्यो अद्रिभिः सुतꣳ सोमं पवित्र आ नय । पुनाहीन्द्राय पातवे ॥

अध्वर्यो । अद्रिभिः । अ । द्रिभिः । सुतम् । सोमम् । पवित्रे । आ । नय । पुनाहि । इन्द्राय । पातवे ॥४९९॥

Samveda - Mantra Number : 499
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 1; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 4;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(अध्वर्यो) यज्ञविधीचा निष्पादक अध्वर्यू नाम ऋत्विजाप्रमाणे ज्ञानयज्ञ संपन्न करणाऱ्या हे मनुष्य, तू (अद्रिभिः) पाटा - वरवंट्याप्रमाणे असलेल्या ज्ञानेंद्रियांद्वारे (सुतम्) काढलेला (सोमम्) सोम औषधीचा रस (पवित्रे) दशापवित्र पात्राप्रमाणे असलेल्या मनरूप पात्रामध्ये (आ नय) आण. नंतर तो ज्ञानरूप सोमरस (इन्द्राय पातवे) जीवात्म्याद्वारे सेवन करण्यासाठी (पुनाहि) मनन प्रक्रियेने शुद्ध कर.।। ३।।
Essence
ज्याप्रमाणे यज्ञात कुटणे, रगडणे आदीच्या पाटा - वरवंटा साधनांनी काढलेला सोमरस दशा पवित्र चाळणीद्वारे चाळून शुद्ध करून पितात व पाजवितात, त्याप्रमाणे ज्ञानार्जनाची साधने म्हणजे ज्ञानेंद्रिये, त्याद्वारे अर्जित ज्ञानाला मनाद्वारे शुद्ध केले पाहिजे.।। ३।।
Subject
अध्वर्यूला प्रेरणा
Special
या मंत्रात श्लेषाद्वारे निघणारा भौतिक सोमविषयक अर्थ (द्वितीय अर्थ) उपमानभावेन व्यक्त होत आहे. (या मंत्रात पाटा - वरवंटा, दशा- पवित्रा मात्र, सोम औषधी ही सर्व उपमान भौतिक पर्दा आहेत व ज्ञानेंद्रिये, मन, जीवात्मा हे सर्व आध्यात्मिक प्रतिके आहेत. म्हणून या मंत्राचे दोन अर्थ निघताहेत.)