Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 49

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- सुदीतिपुरुमीढावाङ्गिरसौ तयोर्वान्यतरः Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
अ꣣ग्नि꣡मी꣢डि꣣ष्वा꣡व꣢से꣣ गा꣡था꣢भिः शी꣣र꣡शो꣢चिषम् । अ꣣ग्नि꣢ꣳ रा꣣ये꣡ पु꣢रुमीढ श्रु꣣तं꣢꣫ नरो꣣ऽग्निः꣡ सु꣢दी꣣त꣡ये꣢ छ꣣र्दिः꣢ ॥४९॥

अ꣣ग्नि꣢म् । ई꣣डिष्व । अ꣡व꣢꣯से । गा꣡था꣢꣯भिः । शी꣣र꣡शो꣢चिषम् । शी꣣र꣢ । शो꣣चिषम् । अग्नि꣢म् । रा꣣ये꣢ । पु꣣रुमीढ । पुरु । मीढ । श्रुत꣢म् । न꣡रः꣢꣯ । अ꣣ग्निः꣢ । सु꣣दीत꣡ये꣢ । सु꣣ । दीत꣡ये꣢ । छ꣣र्दिः꣢ ॥४९॥

Mantra without Swara
अग्निमीडिष्वावसे गाथाभिः शीरशोचिषम् । अग्निꣳ राये पुरुमीढ श्रुतं नरोऽग्निः सुदीतये छर्दिः ॥

अग्निम् । ईडिष्व । अवसे । गाथाभिः । शीरशोचिषम् । शीर । शोचिषम् । अग्निम् । राये । पुरुमीढ । पुरु । मीढ । श्रुतम् । नरः । अग्निः । सुदीतये । सु । दीतये । छर्दिः ॥४९॥

Samveda - Mantra Number : 49
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 5;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(पुकमी) अनेक गुणांनी समृद्ध अशा हे स्तोता (मंत्राद्वारे उपासना करणारा) तू (अवसे) रक्षण, प्रगती, सर्वांविषयी प्रीती आणि तृप्ति लाभाकरीता (शीरशोचिषम्) सर्वत्रव्यापक ज्योतिष्मान अशा (अग्निम्) तेजस्वी परमात्म्याची (गायाभि:) मंत्र वाणीद्वारे (ईडिष्व) स्तुती व आराधना कर. (श्रुतम्) ज्यात त्याच्या महिमेचे वर्णन केले आहे, अशा वेदादी शास्त्रांनी सांगितलेल्या (अग्निम्) त्या परमेश्वराची (राये) भौतिक तसेच आध्यात्मिक अशा सर्व प्रकारच्या धनांच्या प्रापतीसाठी (ईडिष्व) आराधना कर, स्तुती कर. हे (नर:) पौरूषवान मनुष्यांनो, (अग्नि:) विश्वास ठेवा की, तो जगन्नायक परमेश्वर (सुदीतये) उत्तम कर्म करणाऱ्या पुरुषार्थी मनुष्यासाठी (छर्दि) शरणस्थळ वा आश्रय होतो. ।।५।।
Essence
धन आदी समस्त कल्याणांची अभिलाषा असणाऱ्या मनुष्यांनी पुरुषार्थी व्हायला हवे. तसेच ज्याचे तत्र सर्वत्र व्याप्त आहे अशा परमगुरू परमेश्वराने भजन केले पाहिजे. ।।५।।
Subject
आता मनुष्यानी परमेश्वराची स्तुती का करावी? हे सांगतात. -