Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 473

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- जमदग्निर्भार्गवः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
अ꣡सा꣢व्य꣣ꣳशु꣡र्मदा꣢꣯या꣣प्सु꣡ दक्षो꣢꣯ गिरि꣣ष्ठाः꣢ । श्ये꣣नो꣢꣫ न योनि꣣मा꣡स꣢दत् ॥४७३॥

अ꣡सा꣢꣯वि । अँ꣣शुः꣢ । म꣡दा꣢꣯य । अ꣣प्सु꣢ । द꣡क्षः꣢꣯ । गि꣣रिष्ठाः꣢ । गि꣣रि । स्थाः꣢ । श्ये꣣नः꣢ । न । यो꣡नि꣢꣯म् । अ । अ꣣सदत् ॥४७३॥

Mantra without Swara
असाव्यꣳशुर्मदायाप्सु दक्षो गिरिष्ठाः । श्येनो न योनिमासदत् ॥

असावि । अँशुः । मदाय । अप्सु । दक्षः । गिरिष्ठाः । गिरि । स्थाः । श्येनः । न । योनिम् । अ । असदत् ॥४७३॥

Samveda - Mantra Number : 473
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 5; Ardh Prapathak » 2; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 1;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(गिरिष्ठाः) पर्वतावर स्थित (दक्षः) शक्तिवर्धक (अंशुः) सोम औषधी ज्याप्रकारे (अप्सु) पाण्यामध्ये (असावी) अभिषुत केली जाते (त्या वनस्पतीला पाण्यात भिजवून / रगडून त्याचा रस काढला जातो.) तसेच (मिरिष्ठाः) पर्वताप्रमाणे उच्च असलेल्या परब्रह्मामध्ये सणारा (दक्षः) आत्मशक्ती वाढविणार (अंशुः) आनंद रस (मदाय) हर्षप्राप्तीकरिता (असावि) मी अभिषुत केला आहे (अप्सु) माझ्या प्राणां / कर्मांद्वारे मी तो प्राप्त केला आहे. (श्येनः न) वहिरी ससाणा पक्षी (योनिम्) ज्याप्रमाणे आपल्या (योनिम्) घरट्याकडे येतो, तद्वत हा ब्रह्मानंद रस (योनिम्) माझ्या हृदय गृहात (आ सद्) येऊन स्थित जाला आहे. (मी तो आनंद सतत निरंतर अनुभव आहे.)।। ७।।
Essence
जसे ससाणा आदी पक्षी सायंकाळी आपापल्या वृक्षावरील आवास-गृहात येतात, तसेच परब्रह्मापासून झिरपत येणारा आनंद रस हृदय प्रदेशात येतो. तसेच ज्याप्रमाणे सोमलतेचा रस वसतीवरी नावाच्या पात्रातील पाण्यात अभिषुत केला जातो, तसेच हा आनंद रस स्तोताजनाच्या प्राणांतून व कर्मांतून प्रकट होतो.।। ७।।
Subject
आनंद रसाचे वर्णन
Special
या मंत्राच्या पूर्वार्धात श्लिष्ट व्यंग्योपमा व उत्तरार्धात वाच्योपमा अलंकार आहे.।। ७।।