Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 471

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- त्रित आप्त्यः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
ति꣣स्रो꣢꣫ वाच꣣ उ꣡दी꣢रते꣣ गा꣡वो꣢ मिमन्ति धे꣣न꣡वः꣢ । ह꣡रि꣢रेति꣣ क꣡नि꣢क्रदत् ॥४७१॥

ति꣣स्रः꣢ । वा꣡चः꣢꣯ । उत् । ई꣣रते । गा꣡वः꣢꣯ । मि꣣मन्ति । धेन꣡वः꣢ । ह꣡रिः꣢꣯ । ए꣣ति । क꣡नि꣢꣯क्रदत् ॥४७१॥

Mantra without Swara
तिस्रो वाच उदीरते गावो मिमन्ति धेनवः । हरिरेति कनिक्रदत् ॥

तिस्रः । वाचः । उत् । ईरते । गावः । मिमन्ति । धेनवः । हरिः । एति । कनिक्रदत् ॥४७१॥

Samveda - Mantra Number : 471
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 5; Ardh Prapathak » 2; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 1;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(तिसः वाचः) ऋक्, यजु, साम या रूपाच्या तीन वाणी (उदीरते) उठत आहेत, असे मला (उपासकाला) वाटत आहे. हा अनुभव असा आहे की जणू (धनवः) नव प्रसूता (गावः) गायी (मिमन्ति) आपल्या वासराकडे जाण्यासाठी हंबरत आहे. (हरिः) पापहारी आनंदमय रसाचे सोम रसाचे निर्झर (कनिक्रदत्) झर झर नाद करीत (एति) उपासकांच्या मनोभूमीवर बरसत आहे. (मन त्या आनंदात न्हाऊन निघत आहे. अशा त्या दिव्य आध्यात्मिक अनुभवाचे वर्णन एक उपासक करीत आहे.)।। २।।
Essence
(पहा, केवढे रमणीय दृष्य आहे हे) परमेश्वर- आराधनेत लीन उपासक जन ऋक्, यजु, साम या तीन वाणीचे उच्चारण करीत आहेत, जणू काही आपल्या वासराच्या प्रेमाने गायी हंबरत आहेत. रसनिधी परमेश्वराकडून येणाऱ्या आनंद रसाच्या निर्झरात उपासकांच्या मनोभूमी न्हाऊन निघत आहेत. अहा, केवढे आनंदमय वातावरण आहे हे. (केवढा दिव्य अनुभव घेत आहे उपासक योगी)।। ५।।
Subject
आनंद रसाच्या निर्झराचे वर्णन
Special
या मंत्रात व्यंगोत्प्रेक्षा, स्वभावोक्ती आणि अनुप्रास अलंकार आहेत.।। ५।