Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 45

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- वसिष्ठो मैत्रावरुणिः Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
ए꣣ना꣡ वो꣢ अ꣣ग्निं꣡ नम꣢꣯सो꣣र्जो꣡ नपा꣢꣯त꣣मा꣡ हु꣢वे । प्रि꣣यं꣡ चेति꣢꣯ष्ठमर꣣ति꣡ꣳ स्व꣢ध्व꣣रं꣡ विश्व꣢꣯स्य दू꣣त꣢म꣣मृ꣡त꣢म् ॥४५॥

ए꣣ना꣢ । वः꣣ । अग्नि꣢म् । न꣡म꣢꣯सा । ऊ꣣र्जः꣢ । न꣡पा꣢꣯तम् । आ । हु꣣वे । प्रिय꣢म् । चे꣡ति꣢꣯ष्ठम् । अर꣣ति꣢म् । स्व꣣ध्वरम् । सु । अध्वर꣢म् । वि꣡श्व꣢꣯स्य दू꣣त꣢म् । अ꣣मृ꣡त꣢म् । अ꣣ । मृ꣡त꣢꣯म् ॥४५॥

Mantra without Swara
एना वो अग्निं नमसोर्जो नपातमा हुवे । प्रियं चेतिष्ठमरतिꣳ स्वध्वरं विश्वस्य दूतममृतम् ॥

एना । वः । अग्निम् । नमसा । ऊर्जः । नपातम् । आ । हुवे । प्रियम् । चेतिष्ठम् । अरतिम् । स्वध्वरम् । सु । अध्वरम् । विश्वस्य दूतम् । अमृतम् । अ । मृतम् ॥४५॥

Samveda - Mantra Number : 45
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 5;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
मी (एक उपासक) (एना) या माझ्या (नमसा) नमस्कारांद्वारे (ऊर्ज: तपातम्) बळाचा आणि प्राणशक्तीचा जो पुत्र म्हणजे अतिशय बलवान आणि प्राणवान अशा (प्रियम्) प्रिय (चेतिष्ठम्) सर्वाधिक ज्ञानी व ज्ञानप्रदाता तसेच (अरतिम्) सर्वव्यापक वा सुखप्रापक (परमेश्वराचे आवाहन करीत आहे.) याहीपेक्षा अधिक त्या परमेश्वराचे मी पुकारत आहे तो कसा आहे? (स्वध्वरम्) उत्कृष्ट अहिंसामय सृष्टि संचालनरूप दूर करणारा, धर्म, अर्थ, काम व मोक्ष यांची प्राप्ती करून देणारा तसेच काम, क्रोधादी शत्रूंना उदतप्त करणारा व (अमृतम्) स्वरूपेण नाशरहित असणाऱ्या (व:) हे परमेश्वर आपणास मी (आहुवे) बोलावित आहे. (आपला धावा करीत आहे.) ।।१।।
Essence
जो परमात्मा शक्ति व प्राण यांचा कोष आहे जो भक्तवत्सल, पूर्णज्ञानी, सर्वव्यापी, सुख ज्ञानप्रदाता, दु:ख दारिद्रयविनाशक विविध यज्ञकुशल, दोषदग्धकारी, गुणप्रदाता आणि मृत्यूपासून दूर वा रहित म्हणजे अमर आहे, अशा त्या परमेश्वराची सर्वांनी श्रद्धाभावनेने स्तुती केली पाहिजे. ।।१।।
Subject
प्रथम मंत्रात परमात्म्याच्या गुणांचे वर्णन केले आहे. -