Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 443

733 Mantra
Devata- उषाः Rishi- संवर्त आङ्गिरसः Chhand- द्विपदा विराट् पङ्क्तिः Swara- पञ्चमः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
आ꣡ या꣢हि꣣ व꣡न꣢सा स꣣ह꣡ गाव꣢꣯ सचन्त वर्त꣣निं꣡ यदूध꣢꣯भिः ॥४४३॥

आ꣢ । या꣣हि । व꣡न꣢꣯सा । स꣣ह꣢ । गा꣡वः꣢꣯ । स꣣चन्त । वर्त्तनि꣢म् । यत् । ऊ꣡ध꣢꣯भिः ॥४४३॥

Mantra without Swara
आ याहि वनसा सह गाव सचन्त वर्तनिं यदूधभिः ॥

आ । याहि । वनसा । सह । गावः । सचन्त । वर्त्तनिम् । यत् । ऊधभिः ॥४४३॥

Samveda - Mantra Number : 443
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 5; Ardh Prapathak » 2; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 4; Khand » 10;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
उषेप्रमाणे तेजोमयी हे जगन्माते (परमेश्वरा), तू (वनसा सह) आपल्या अधिकतम तेजासह (आ याहि) ये, माझ्या हृदयात प्रादुर्भूत हो. (यत्) जेव्हा (गावः) वेदरूपिणी गायी (ऊघभिः) ज्ञानरसाने परिपूर्ण मंत्र रूप ऊधसांद्वारे (गाईचे स्तन) (वर्तनिम्) माझ्या आत्मरूप दोहमगृहात (सचन्त) याव्यात. (सकाळी गायी चरण्यासाठी वनात जातात. सकाळी- सायंकाळी दूध देतात. तद्वत उपासकाच्या हृदयी सकाळी - संध्याकाळी ईश्वराचे ध्यान यावे, अशी कल्पना आहे.)।। ७।।
Essence
जसे उषेच्या आगमना होताना घागरीप्रमाणे मोठे स्तन असलेल्या गायी दूध देण्यासाठी दोहनगृहात येतात, तसे हृदयात जगन्मातेचा प्रादुर्भाव झाल्यानंत ज्ञानरसाने पूर्ण वेदरूपिणी गायी आपले ज्ञानरूप दूध देण्यासाठी स्तोताजनांच्या आत्म्यात जागृत होतात.।। ७।।
Subject
उषा देवता। उषा नावाने जगन्मातेचे आवाहन
Special
या मंत्रात उपमानापेक्षा उपमेय अधिक प्रभावी आहे. त्यामुळे येथे अतिशयोक्ती अलंकार आहे.।। ७।।