Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 435

733 Mantra
Devata- वाजिनः Rishi- ऋण0त्रसदस्यू Chhand- पुरउष्णिक् Swara- ऋषभः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
आ꣣वि꣡र्म꣢र्या꣣ आ꣡ वाजं꣢꣯ वा꣣जि꣡नो꣢ अग्मन् दे꣣व꣡स्य꣢ सवि꣣तुः꣢ स꣣व꣢म् । स्व꣣र्गा꣡ꣳ अ꣢र्वन्तो जयत ॥४३५

आ꣣विः꣢ । आ꣣ । विः꣢ । म꣣र्याः । आ꣢ । वा꣡ज꣢꣯म् । वा꣣जि꣡नः꣢ । अ꣣ग्मन् । देव꣡स्य꣢ । स꣣वितुः꣢ । स꣣व꣢म् । स्व꣣र्गा꣢न् । स्वः꣣ । गा꣢न् । अ꣣र्वन्तः । जयत ॥४३५॥

Mantra without Swara
आविर्मर्या आ वाजं वाजिनो अग्मन् देवस्य सवितुः सवम् । स्वर्गाꣳ अर्वन्तो जयत ॥४३५

आविः । आ । विः । मर्याः । आ । वाजम् । वाजिनः । अग्मन् । देवस्य । सवितुः । सवम् । स्वर्गान् । स्वः । गान् । अर्वन्तः । जयत ॥४३५॥

Samveda - Mantra Number : 435
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 5; Ardh Prapathak » 1; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 4; Khand » 9;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(वाजिनः) ज्ञानी लोक (वाजम्) शक्ती आणि (देवस्य) प्रकाशक (सवितुः) प्रेरक परमेश्वराकडून मिळणारी (सवम्) प्रेरणा (आ अग्मन्) प्राप्त करतात. (अज्ञानी त्या प्रेरणेकडे दुर्लक्ष करतात.) हे (मर्याः) मनुष्यांनो, तुम्हीदेखील (आविः) आपल्या आत्म्यात बळ आणि परमेश्वराची प्रेरणा उत्पन्न करा. हे (अर्चन्तः) उद्योगशील मनुष्यांनो, तुम्ही (स्त्रर्गान्) सुखकारी ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास या चार लोकांवर व मुक्ती लोकांवर (जयत) विजय प्राप्त करा.।। ९।।
Essence
मनुष्यांनी आत्मबल संचित करून आणि परमेश्वराकडून सत्प्रेरणा प्राप्त करून शुभ कर्म करीत लौकिक आणि पारलौकिक सुख प्राप्त केले पाहिजे.।। ९।।
Subject
वाजीजनांची (ज्ञानवान व्यक्तींची) स्तुती
Special
या मंत्रात ‘अर्वन्तः’ या शब्दाच्या प्रयोगातून ‘जसे घोडे युद्ध जिंकतात’ हा उपमा अलंकार ध्वनित होत आहे. ‘वाजे, राजं,’ आणि ‘सवि, सव’मध्ये छेकानुप्रास तसेच ‘व’ वर्णाची अनेक वेळा आवृत्ती असल्यामुळे येथे वृत्त्यनुप्रास आहे.।। ९।।