Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 43

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- भर्गः प्रागाथः Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
आ꣡ नो꣢ अग्ने वयो꣣वृ꣡ध꣢ꣳ र꣣यिं꣡ पा꣢वक꣣ श꣡ꣳस्य꣢म् । रा꣡स्वा꣢ च न उपमाते पु꣣रु꣢स्पृह꣣ꣳ सु꣡नी꣢ती꣣ सु꣡य꣢शस्तरम् ॥४३॥

आ꣢ । नः꣣ । अग्ने । वयोवृ꣡धम्꣢ । वयः । वृ꣡ध꣢꣯म् । र꣣यि꣢म् । पा꣣वक । शँ꣡स्य꣢꣯म् । रा꣡स्वा꣢꣯ । च꣣ । नः । उपमाते । उप । माते । पुरुस्पृ꣡ह꣢म् । पु꣣रु । स्पृ꣡ह꣢꣯म् । सु꣡नी꣢꣯ती । सु । नी꣣ती । सु꣡य꣢꣯शस्तरम् । सु । य꣣शस्तरम् ॥४३॥

Mantra without Swara
आ नो अग्ने वयोवृधꣳ रयिं पावक शꣳस्यम् । रास्वा च न उपमाते पुरुस्पृहꣳ सुनीती सुयशस्तरम् ॥

आ । नः । अग्ने । वयोवृधम् । वयः । वृधम् । रयिम् । पावक । शँस्यम् । रास्वा । च । नः । उपमाते । उप । माते । पुरुस्पृहम् । पुरु । स्पृहम् । सुनीती । सु । नीती । सुयशस्तरम् । सु । यशस्तरम् ॥४३॥

Samveda - Mantra Number : 43
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 4;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (पावक) चित्तशोधक, पतित पावन, (अग्ने) सन्मार्गदर्शक परमात्मन, आपण (वयोवृधम्) आम्हाला दीर्घायुष्य प्रदान करणारे (शंस्यम्) प्रशंसनीय (रयिम्) धन (न:) आमच्यासाठी (आ) आणा (द्या) आणि ते धन आणून हे (तपम: वे) उपमानभूत, सर्वोत्तम परमात्मन, (पुरुरवृहम्) अत्यधिक वांछित अथवा अनेकांद्वारे वांछित (सुयशस्तरम्) ते अत्यंत कीर्तिदायक धन (सुनीती) सन्मार्गावर चालवीत (न:) आम्हास (रास्व च) प्रदानही करा. ।।९।।
Essence
परमेश्वराच्या कृपेने आणि आपल्या पुरुषार्थाने सन्मार्गाचे अनुसरण करीत आम्ही चांदी, सोने, भूमीचे राज्य आदी भौतिक धनाचा संचय करावा, तसेच विद्या, विनय, योगसिद्धी, मोक्ष आदी आध्यात्मिक धनाचाही संग्रह करावा. अशाप्रकारे अर्जित धन आमचे आयुष्य वाढविणारे आणि आमची कीर्ती वृद्धींगत करणारे व्हावे, (असे आम्ही चिंतितो. आम्हाला पुरुषार्थविना प्राप्त धन नको अथवा ज्यामुळे आमची दुष्कीर्ती होईल, असे धनही आम्हास नको.) ।।९।।
Subject
ईश्वराने आम्हास कसे व कोणचे धन द्यावे, हे सांगतात. -