Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 423

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- गोतमो राहूगणः Chhand- पङ्क्तिः Swara- पञ्चमः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
क्र꣡त्वा꣢ म꣣हा꣡ꣳ अ꣢नुष्व꣣धं꣢ भी꣣म꣡ आ वा꣢꣯वृते꣣ श꣡वः꣢ । श्रि꣣य꣢ ऋ꣣ष्व꣡ उ꣢पा꣣क꣢यो꣣र्नि꣢ शि꣣प्री꣡ हरि꣢꣯वान् दधे꣣ ह꣡स्त꣢यो꣣र्व꣡ज्र꣢माय꣣स꣢म् ॥४२३॥

क्र꣡त्वा꣢꣯ । म꣣हा꣢न् । अ꣣नुष्वध꣢म् । अ꣣नु । स्वध꣢म् । भी꣣मः꣢ । आ । वा꣣वृते । श꣡वः꣢꣯ । श्रि꣣ये꣢ । ऋ꣣ष्वः꣢ । उ꣣पाक꣡योः꣢ । नि । शि꣣प्री꣢ । ह꣡रि꣢꣯वान् । द꣣धे । ह꣡स्त꣢꣯योः । व꣡ज्र꣢꣯म् । आ꣣यस꣢म् ॥४२३॥

Mantra without Swara
क्रत्वा महाꣳ अनुष्वधं भीम आ वावृते शवः । श्रिय ऋष्व उपाकयोर्नि शिप्री हरिवान् दधे हस्तयोर्वज्रमायसम् ॥

क्रत्वा । महान् । अनुष्वधम् । अनु । स्वधम् । भीमः । आ । वावृते । शवः । श्रिये । ऋष्वः । उपाकयोः । नि । शिप्री । हरिवान् । दधे । हस्तयोः । वज्रम् । आयसम् ॥४२३॥

Samveda - Mantra Number : 423
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 5; Ardh Prapathak » 1; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 4; Khand » 8;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(प्रथम अर्थ) (परमात्मपर) (क्रत्वा) दिव्य प्रज्ञा आणि जगत् धारण आदी कर्मामुळे महान व (भीमः) नियम भंग करणाऱ्यासाठी जो भयंकर आहे, असा तो इन्द्र परमेश्वर (अनु स्वधम्) आपल्या धारणा शक्तीद्वारे (शवः) बलवान सूर्य, चंद्र, पृथ्वी आदी ग्रहांना (आ वावृते) परिभ्रमित करत आहे. (ऋष्वः) लोक - लोकांतरांना आपापल्या कक्षेत संचालित करणारा, (शिप्री) जगाचा निस्तारक आणि (हरिवान्) अकर्मण्यत्व आदी दोषांचे हरण करणारा तो (श्रिये) आम्हाला ऐश्वर्य प्रदान करण्यासाठी (उपासयोः) जोडलेल्या (हस्तमोः) दोन्ही हातात (आयसम्) दृढ (वज्रम्) शस्त्रास्त्र समूह (आ दधे) देतो.।।
द्वितीय अर्थ - (सेनापतीपर) - (क्रत्वा) शत्रुवध आदी कर्मामुळे (महान्) महान असून जो (भीमः) दुर्जनाकरिता भयंकर आहे, असा इंद्र वीर सेनापती (अनु स्वधम्) पौष्टिकतेसाठी आवश्यक ते अन्न सेवन करून (शवः) शरीरात शक्ती उत्पन्न करतो. (ऋष्वः) गतिमान, कर्मशी आणि (शिप्री) शत्रु पक्षात हाहाकार माजविणारा व (हरिवान्) विशाल घोडे असलेला अथवा हरणाची साधने म्हणजे रथ, विमन आदी बाळगणारा तो सेनापती (श्रिये) विजयश्री प्राप्त करण्यासाटी व (उषाकयोः) जवळ आलेल्या शत्रु दलावर प्रहार करण्यासाठी (हस्तयोः) हाती (आयसम्) लौहापासून निर्मित अथवा लोखंडासारखे दृढ (वज्रम्) शस्त्रास्त्र समूह (नि दधे) धारण करीत आहे.।। ५।।
Essence
जसे परमेश्वर काही वेळा अकर्मण्य वा भीरू लोकांच्याही हृदयात (तसा प्रसंग उद्भवल्यास) वीरत्वाचा संचार करून त्यांच्या हातात शस्त्र धारण करायला लावतो, तसेच सेनापतीने आपल्या हातात शत्रुवधासाठी दृढ शस्त्रास्त्रे धारण करावीत आणि शत्रूंवर प्रहार करून त्यांना पराजित करावे.।। ५।।
Subject
इन्द्र नावाने परमेश्वराची व सेनापतीची कर्मे वर्णित आहेत -
Special
या मंत्रात श्लेषालंकार आहे.।। ५।।