Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 413

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- गोतमो राहूगणः Chhand- पङ्क्तिः Swara- पञ्चमः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
प्रे꣢ह्य꣣भी꣡हि꣢ धृष्णु꣣हि꣢꣫ न ते꣣ व꣢ज्रो꣣ नि꣡ य꣢ꣳसते । इ꣡न्द्र꣢ नृ꣣म्ण꣢꣫ꣳहि ते꣣ श꣢वो꣣ ह꣡नो꣢ वृ꣣त्रं꣡ जया꣢꣯ अ꣣पो꣢ऽर्च꣣न्न꣡नु꣢ स्व꣣रा꣡ज्य꣢म् ॥४१३॥

प्र꣢ । इ꣣हि । अभि꣢ । इ꣣हि । धृष्णुहि꣢ । न । ते꣣ । व꣡ज्रः꣢꣯ । नि । यँ꣣सते । इ꣡न्द्र꣢꣯ । नृ꣣म्ण꣢म् । हि । ते꣣ । श꣡वः꣢꣯ । ह꣡नः꣢꣯ । वृ꣣त्र꣢म् । ज꣡याः꣢꣯ । अ꣣पः꣢ । अ꣡र्च꣢꣯न् । अ꣡नु꣢꣯ । स्व꣣रा꣡ज्य꣢म् । स्व꣣ । रा꣡ज्य꣢꣯म् ॥४१३॥

Mantra without Swara
प्रेह्यभीहि धृष्णुहि न ते वज्रो नि यꣳसते । इन्द्र नृम्णꣳहि ते शवो हनो वृत्रं जया अपोऽर्चन्ननु स्वराज्यम् ॥

प्र । इहि । अभि । इहि । धृष्णुहि । न । ते । वज्रः । नि । यँसते । इन्द्र । नृम्णम् । हि । ते । शवः । हनः । वृत्रम् । जयाः । अपः । अर्चन् । अनु । स्वराज्यम् । स्व । राज्यम् ॥४१३॥

Samveda - Mantra Number : 413
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 5; Ardh Prapathak » 1; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 4; Khand » 7;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (इन्द्र) जीवात्मा, राजा आणि हे सेनापती, तुम्ही (प्रेहि) पुढे चला, पुढे पुढे जा. (अभिहि) शत्रूवर आक्रमण करा. (धृष्णुहि) आणि त्याचा पराभव करा. (ते) तुमच्या जवळ (वज्रः) वज्राप्रमाणे भयंकर असे जे शत्रु-विनाशक सामर्थ्य आहे अथवा जो भीषण शस्त्रास्त्र समूह आहे, त्याचा (न) (नियंसते) कोणीही प्रतिकार करू शकत नाही. (ते) तुमचे (शवः) बळ (नृम्णं हि) तेच तुमचे सर्वोत्कृष्ट धन आहे. तुम्ही (स्वराज्यम् अनु) स्वराज्यासाठी अनुरूप (अर्चन्) कर्म करीत (वृत्रम्) पापाला व शत्रूला (हनः) विनष्ट करो आणि तुम्ही (अपः) शत्रूने रोखून ठेवलेल्या सत्कर्म समूहाला (जयाः) जिंकून घेण्यात यशस्वी व्हावे (अशी आम्हा प्रजाजनांची कामना आहे.)
Essence
मनुष्याचा आत्मा, कोणी राजा अथवा कोणी सेनापती जेव्हा आपल्यातील दुर्दमनीय शक्तला ओळखून घेतात तेव्हा ते सर्व आंतरिक व बाह्य शत्रूंना धूळ चारून अवश्यमेव सर्व कार्यात यशस्वी होतात.।। ५।।
Subject
इंद्र नावाने जीवात्मा, राजा व सेनापती यांना विजयासाठी प्रोत्साहन
Special
या मंत्रात वीर रस आहे. श्लेष अलंकार आहे. अनेक क्रियापदांचा कर्ता एकच असल्यामुळे येथे दीपक अलंकारही आहे.।। ५।।