Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 41

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- शंयुर्बार्हस्पत्यः Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
त्वं꣡ न꣢श्चि꣣त्र꣢ ऊ꣣त्या꣢꣫ वसो꣣ रा꣡धा꣢ꣳसि चोदय । अ꣣स्य꣢ रा꣣य꣡स्त्वम꣢꣯ग्ने र꣣थी꣡र꣢सि वि꣣दा꣢ गा꣣धं꣢ तु꣣चे꣡ तु नः꣢꣯ ॥४१॥

त्व꣢म् । नः꣣ । चित्रः꣢ । ऊ꣣त्या꣢ । व꣡सो꣢꣯ । रा꣡धाँ꣢꣯सि । चो꣣दय । अस्य꣢ । रा꣣यः꣢ । त्वम् । अ꣣ग्ने । रथीः꣢ । अ꣣सि । विदाः꣢ । गा꣣ध꣢म् तु꣣चे꣢ । तु । नः꣣ ॥४१॥

Mantra without Swara
त्वं नश्चित्र ऊत्या वसो राधाꣳसि चोदय । अस्य रायस्त्वमग्ने रथीरसि विदा गाधं तुचे तु नः ॥

त्वम् । नः । चित्रः । ऊत्या । वसो । राधाँसि । चोदय । अस्य । रायः । त्वम् । अग्ने । रथीः । असि । विदाः । गाधम् तुचे । तु । नः ॥४१॥

Samveda - Mantra Number : 41
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 4;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (वको) निवासक (अग्ने) परमात्मन (चित्र:) अद्भुत गुण, कर्म आणि स्वभाव असणारे, पूज्य आणि दर्शनीय (त्वम्) आपण (ऊत्या) आपल्या रक्षण सामर्थ्यासह (न:) आम्हाला (राधांसि) विश्वा, सुवर्ण, चक्रवर्तीशक्य, मोक्ष आदी धन प्राप्त करण्यासाठी प्रेरित करा. (आपल्या प्रेरणेमुळे आम्हाला हे सर्व मिळावे.) (त्वम्) आपण (अस्य) या दृश्यमान (राय:) लौकिक आणि पारमार्थिक धनाचे (रधी:) स्वामी (असि) आहात. यामुळे (न:) आम्हाला व (तुवे) आमच्या पुत्रपौत्रादींना (तू) शाघमेव आणि अवश्य (सधनम्) पूर्वपर्णित धन इच्छेप्रमाणे म्हणजे अपरिमित धन संपत्ती (विदा:) प्राप्त करून द्या. (ही प्रार्थना.) ।।७।।
Essence
हे जगदीश्वर, आपण सर्व प्राण्यांचे आणि नक्षत्र, ग्रह, उपग्रह आदींचे निवासक (म्हणजे त्यांना त्यांच्या कक्षेत व स्थानात स्थिर वा गतिमान करणारे आहात, म्हणून आपणास वसु म्हणतात. या संसारामध्ये दिसणारे सोन-चांदी, मोती, मणी, हीरक आदी धनाचे आपणच स्वामी आहात. कंद, मूल, फळ आदी पदार्थ दूध, दही, लोणी आदी खाद्यपदार्थ शौच, संतो, तप, स्वाध्याय आदीचे तसेच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या सर्व धनांचे आपणच अधिपती आहात. कृपा करून आमच्या स्वभावात पुरुषार्थ वृत्ती उत्पन्न करा. कारण की, त्यामुळे आम्हीदेखील त्या भौतिक व आध्यात्मिक धनाचे अधिपती होऊ शकू. ।।७।।
Subject
पुढील मंत्रात परमेश्वराला धनासाठी प्रार्थना केली आहे. -