Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 404

733 Mantra
Devata- मरुतः Rishi- सौभरि: काण्व: Chhand- ककुप् Swara- ऋषभः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
गा꣡व꣢श्चिद्घा समन्यवः सजा꣣꣬त्ये꣢꣯न म꣣रु꣢तः꣣ स꣡ब꣢न्धवः । रि꣣ह꣡ते꣢ क꣣कु꣡भो꣢ मि꣣थः꣢ ॥४०४॥

गा꣡वः꣢꣯ । चि꣣त् । घ । समन्यवः । स । मन्यवः । सजात्ये꣢꣯न । स꣣ । जात्ये꣢꣯न । म꣣रु꣡तः꣢ । स꣡ब꣢꣯न्धवः । स । ब꣣न्धवः । रिह꣡ते꣢ । क꣣कु꣡भः꣢ । मि꣣थः꣢ ॥४०४॥

Mantra without Swara
गावश्चिद्घा समन्यवः सजात्येन मरुतः सबन्धवः । रिहते ककुभो मिथः ॥

गावः । चित् । घ । समन्यवः । स । मन्यवः । सजात्येन । स । जात्येन । मरुतः । सबन्धवः । स । बन्धवः । रिहते । ककुभः । मिथः ॥४०४॥

Samveda - Mantra Number : 404
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 5; Ardh Prapathak » 1; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 4; Khand » 6;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (समन्यवः) तेजस्वी (गावः) स्तोता ब्राह्मणजनहो, (सजात्येन) समान जातीचे असल्यामुळे (मरुतः) क्षत्रिय योद्धा (चिद् घ) अवश्यमेव (सबन्धनः) तुमचे बंधु आहेत. कारण ते युद्धाच्या प्रसंगी (मिथः) सर्वजण मिळून (ककुभः) दिशा- दिशांमध्ये (रिहते) व्याप्त होतात. (चारही दिशात आक्रमण करतात) व शत्रूचा सामना करतात.) अथवा ते क्षत्रिय (मिथः तुम्हा ब्राह्मणांसह (ककुभः) ककुप् छंदात असलेली या मंत्र दशतीतील ऋचांचा (रिहते) पाठ करतात अथवा त्यांचे अर्थज्ञानपूर्वक त्या मंत्राचा आस्वाद घेतात.
Essence
स्तोता ब्राह्मण आणि रक्षक क्षत्रिय दोघेही राष्ट्राचे अनिवार्य भाव आहेत. जसे ब्राह्मण विद्यानद करून क्षत्रियांवर उपकार करतात. तद्वत युद्धाच्या वेळी क्षत्रिय सर्व दिशांकडे चाल करून जातात व शत्रूंना पराजित करून ब्राह्मणांना उपकृत करतात. यामुळे ब्राह्मणांनी व क्षत्रियांनी राष्ट्रात बंधुत्व भावनेने संघटित असायला पाहिजे.।। ६।।
Subject
मरुतः (अनेक मरुत) देवता। मरुतांशी बंधुत्व सावे.
Special
या दशतीच्या मंत्रांचा छंद ककुप् उष्णिक् आहे. या छंदाच्या प्रथम व तृतीय चरणात आठ अक्षरे आणि मध्यातील द्वितीय पाद बारा अक्षरांचा असतो.।। ६।।