Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 395

733 Mantra
Devata- आदित्याः Rishi- इरिम्बिठिः काण्वः Chhand- उष्णिक् Swara- ऋषभः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
तु꣣चे꣡ तुना꣢꣯य꣣ त꣢꣫त्सु नो꣣ द्रा꣡घी꣢य꣣ आ꣡यु꣢र्जी꣣व꣡से꣢ । आ꣡दि꣢त्यासः समहसः कृ꣣णो꣡त꣢न ॥३९५॥

तु꣣चे꣢ । तु꣡ना꣢꣯य । तत् । सु । नः꣣ । द्रा꣡घी꣢꣯यः । आ꣡युः꣢꣯ । जी꣣व꣡से꣢ । आ꣡दि꣢꣯त्यासः । आ । दि꣣त्यासः । समहसः । स । महसः कृणो꣡त꣢न । कृ꣣णो꣡त꣢ । न꣣ ॥३९५॥

Mantra without Swara
तुचे तुनाय तत्सु नो द्राघीय आयुर्जीवसे । आदित्यासः समहसः कृणोतन ॥

तुचे । तुनाय । तत् । सु । नः । द्राघीयः । आयुः । जीवसे । आदित्यासः । आ । दित्यासः । समहसः । स । महसः कृणोतन । कृणोत । न ॥३९५॥

Samveda - Mantra Number : 395
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 5; Ardh Prapathak » 1; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 4; Khand » 5;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (समहसः) तेजस्वी (आदित्यासः) आदित्याप्रमाणे ज्ञान- प३काशाने भासमान ब्रह्मवित् ब्राह्मणहो, अथवा हे माझ्या प्राणांनो, तुम्ही(तुचे) संतती प्राप्तीसाठी (तुनाम) धनासाठी आणि (जीवसे) उत्तम, दीर्घ आयुष्यासाठी (त्) त्या, इतर प्राण्यांपेक्षा वेगळी असलेल्या अशा (नः आयुः) आमच्या आयुष्याला (द्राघीयः) अधिक दीर्घ (सु कृणोतन) सुंदर सुरू करा.।।
संतती दोन प्रकारची असते - भौतिक संतान आणि मानस संतान. पुत्र, पुत्री आदी भौतिक संताने आणि नवीन ज्ञान - विज्ञान आदींना मानसिक संतान म्हणतात. धनदेखील दोन प्रकारचे सते. भौतिक आणि आध्यात्मिक चांदी, सोने, कापड, धान्य, नाणी आदी भौतिक धन असून अहिंसा, सत्य, न्याय, योगसिद्धी आदींना आध्यात्मिक धन म्हटले जाते. उत्कृष्ट जीवनदेखील दोन प्रकारचे सते. बाह्य आणि आध्यात्मितक. भौतिक सुख- संपदेने परिपूर्ण जीवनाला बाह्य जीवन मानावे व अध्यात्म- मार्गाचा जो यात्री त्याच्या जीवनाला आध्यात्मिक जीवन समजावे. हे सर्व आम्हांकरिता सुलभ व्हावे, म्हणून दीर्घ जीवनासाठी प्रार्थना केली आहे.।। ५।।
Essence
प्राणायामाने आणि विद्वान ब्राह्मणांनी केलेल्या उपदेशाचे पालन केल्यामुळे आमचे आयुष्य दीर्घ होऊ शकते. दीर्घायू प्राप्त करून आम्ही आपल्या आवडीप्रमाणे प्रेय मार्ग वा श्रेय मार्ग अनुसरावा.।। ५।।
Subject
आदित्य देवता। येथे दीर्घतर आमूची प्रार्थना
Special
या मंत्रात ‘तु, तन’मध्ये छेकानुप्रास आहे. ‘त्, स्, न्’ या वर्णांची पुनरावृत्ती असल्यामुळे वृत्त्यनुप्रास अलंकार आहे.।। ५।।