Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 392

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- भरद्वाजो बार्हस्पत्यः Chhand- उष्णिक् Swara- ऋषभः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
य꣢स्य꣣ त्य꣡च्छम्ब꣢꣯रं꣣ म꣢दे꣣ दि꣡वो꣢दासाय र꣣न्ध꣡य꣢न् । अ꣣य꣡ꣳ स सोम꣢꣯ इन्द्र ते सु꣣तः꣡ पिब꣢꣯ ॥३९२॥

य꣡स्य꣢꣯ । त्यत् । शं꣡ब꣢꣯रम् । शम् । ब꣣रम् । म꣡दे꣢ । दि꣡वो꣢꣯दासाय । दि꣡वः꣢꣯ । दा꣣साय । रन्ध꣡य꣢न् । अ꣣य꣢म् । सः । सो꣡मः꣢ । इ꣣न्द्र । ते । सुतः꣢ । पि꣡ब꣢꣯ ॥३९२॥

Mantra without Swara
यस्य त्यच्छम्बरं मदे दिवोदासाय रन्धयन् । अयꣳ स सोम इन्द्र ते सुतः पिब ॥

यस्य । त्यत् । शंबरम् । शम् । बरम् । मदे । दिवोदासाय । दिवः । दासाय । रन्धयन् । अयम् । सः । सोमः । इन्द्र । ते । सुतः । पिब ॥३९२॥

Samveda - Mantra Number : 392
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 5; Ardh Prapathak » 1; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 4; Khand » 5;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (इन्द्र) विघ्न विदारक परमश्वर, (यस्य) ज्या पुरुषार्थ मिश्रित भक्तीरूप सोमरसाच्या (मदे) आनंदात (दिवोदासाय) मनःप्रकाशक जीवात्म्याच्या साह्यासाठी, (शम्बरम्) योगमार्गात येणाऱ्या आनंद व शांती यांना संपविणाऱ्या विघ्नांना (रन्धयन्) विनष्ट करीत (त्यत्) तुम्ही ते प्रख्यात वीरकर्म करता (भक्तांची उपासना स्वीकारून त्यांच्या व योगीजनांच्या साह्यासाटी त्यांच्या मार्गातील विघ्न- बाधा दूर करतो.) (अयं सः) तोच हा (सोमः) पुरुषार्थामिश्रित भक्तीरस आम्ही (ते) तुमच्यासाठी (सुतः) गाळला आहे. तो रस तुम्ही (पिब) प्या. (आमच्या हृदयातील भक्तिभाव स्वीकारा.)
Essence
केवल भक्तीने नव्हे, तर पुरुषार्थाद्वारे समर्पित आराधनेमुळे परमेश्वर योगसाधकाच्या मार्गातील सर्व विघ्न- बाधा दूर सारतो व साधकास / उपासकास योगसिद्धी / कार्यसिद्धि प्रयत्न करतो.।। २।।
Subject
परमेश्वराच्या वीरत्वाची प्रशंसा करीत त्याचे आवाहन करणे.