Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 39

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- भर्गः प्रागाथः Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
अ꣢ग्ने꣣ ज꣡रि꣢तर्वि꣣श्प꣡ति꣢स्तपा꣣नो꣡ दे꣢व र꣣क्ष꣡सः꣢ । अ꣡प्रो꣢षिवान्गृहपते म꣣हा꣡ꣳ अ꣢सि दि꣣व꣢स्पा꣣यु꣡र्दु꣢रोण꣣युः꣢ ॥३९॥

अ꣡ग्ने꣢꣯ । ज꣡रि꣢꣯तः । वि꣣श्प꣡तिः꣢ । त꣣पानः꣢ । दे꣣व । रक्ष꣡सः꣢ । अ꣡प्रो꣢꣯षिवान् । अ । प्रो꣣षिवान् । गृहपते । गृह । पते । महा꣢न् । अ꣣सि । दि꣣वः꣢ । पा꣣युः꣢ । दु꣣रोणयुः꣢ । दुः꣣ । ओनयुः꣢ । ॥३९॥

Mantra without Swara
अग्ने जरितर्विश्पतिस्तपानो देव रक्षसः । अप्रोषिवान्गृहपते महाꣳ असि दिवस्पायुर्दुरोणयुः ॥

अग्ने । जरितः । विश्पतिः । तपानः । देव । रक्षसः । अप्रोषिवान् । अ । प्रोषिवान् । गृहपते । गृह । पते । महान् । असि । दिवः । पायुः । दुरोणयुः । दुः । ओनयुः । ॥३९॥

Samveda - Mantra Number : 39
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 4;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
प्रथम अर्थ (परमेश्वरपरक) (जरित:) सज्जनांच्या गुणांचे प्रशंसक (प्रेरणा करून त्यांचे गुण वाढविणारे) हे परमात्मन् तुम्ही (विश्यति:) सर्वांचे मनुष्यमात्राचे पालक आहात. हे (देव) ज्योतिर्मय तुम्ही (रक्षस:) राक्षसी वृत्तीच्या मनुष्यांना (तपान:) संताप वा दंड देणारे आहात. हे (गृहपते) ब्रह्मांडरूप गृहाचे स्वामी (अघोषिवान्) आपण ब्रह्मांडरूप गृहापासून कधीही दूर न जाणारे (अर्थात सर्वत्रव्यापक) (दिव:) (पायु) प्रकाशमान द्युलोकाचे अथवा प्रकाशमान जीवात्म्याचे रक्षक असून (दुरोणयु:) सर्वांसाठी निवासासाठी घर देण्याची इच्छा असणारे असे आपण खरोखर (महान) महान (असि) आहात.
द्वितीय अर्थ : (राजपरक) - हे (जरित:) परमेश्वराची स्तुती करणारे (अग्ने) राष्ट्रनायक राजा, आपण (विश्यति:) प्रजापालक आहात. (देव) दान आदी गुणांमुळे देदीप्यमान असणारे हे राजन् आपण (रक्षस:) दुष्यांचे व शत्रूंचे (तापन:) संतापक आहात. हे (गृहपते) राष्ट्ररूप गृहाचे स्वामी आपण (अप्रोषिवान्) राष्ट्रपासून कधीही दूर न होणारे तसेच (दिव:) (पायु) निका आदी प्रकाशाने रक्षक (दुरोणमु) राष्ट्ररूप घराची सदा उन्नती इच्छिणारे आपण खरोखर (महान) महम (असि) आहात. ।।५।।
Essence
ज्याप्रमाणे परमेश्वर सज्जनांची रक्षा करीत आणि दुर्जनांना दंड देत सर्वांचे उत्कर्ष करू इच्छितो, त्याप्रमाणे राजानेदेखील प्रजापालन करीत दुष्यांचे उन्मुलन करीत राष्ट्राला उत्कर्षाप्रत नेले पाहिजे. ।।५।।
Subject
पुढील मंत्रात परमेश्वराचा आणि विद्वानाचा महिमा वर्णित आहे. -
Special
या मंत्रात अर्थश्लेष अलंकार आहे. ।।५।।