Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 38

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- वसिष्ठो मैत्रावरुणिः Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
त्वे꣡ अ꣢ग्ने स्वाहुत प्रि꣣या꣡सः꣢ सन्तु सू꣣र꣡यः꣢ । य꣣न्ता꣢रो꣣ ये꣢ म꣣घ꣡वा꣢नो꣣ ज꣡ना꣢नामू꣣र्वं꣡ दय꣢꣯न्त꣣ गो꣡ना꣢म् ॥३८॥

त्वे꣣ इति꣢ । अ꣣ग्ने । स्वाहुत । सु । आहुत । प्रिया꣡सः꣢ । स꣣न्तु । सूर꣡यः꣢ । य꣣न्ता꣡रः꣢ । ये । म꣣घ꣡वा꣢नः । ज꣡ना꣢꣯नाम् । ऊ꣣र्व꣢म् । दय꣢꣯न्त । गो꣡ना꣢꣯म् ॥३८॥

Mantra without Swara
त्वे अग्ने स्वाहुत प्रियासः सन्तु सूरयः । यन्तारो ये मघवानो जनानामूर्वं दयन्त गोनाम् ॥

त्वे इति । अग्ने । स्वाहुत । सु । आहुत । प्रियासः । सन्तु । सूरयः । यन्तारः । ये । मघवानः । जनानाम् । ऊर्वम् । दयन्त । गोनाम् ॥३८॥

Samveda - Mantra Number : 38
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 4;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (स्वाहुत) उपासकांच्या श्रद्धारूप रसाच्या हवीमुळे सम्यक आहुतिप्राप्त (अग्ने) तेजोमय परमात्मन आपले (सूरय) स्तोता विद्वज्जन (त्वे) आपल्या दृष्टीत (प्रिभास:) प्रिय (सन्तु) व्हावेत (आपले प्रेमपात्र होऊ द्या) (मधवान:) लौकिक आणि आध्यात्मिक धनाने संपन्न असे (ये) जे लोक (जनानाम्) इतर लोकांच्या शुभ व अशुभ कर्मांवर नियंत्रण ठेवतात आणि (गोनाम्) चक्षु आदी इंद्रियांचे (उर्वम्) हिंसक दोष (दयन्त) नष्ट करतात. अथवा (ये) जे लोक (गोनाम्) वेदवाणीचे (ऊर्वम्) समू (सूक्त वा मंत्र) (दयन्त) इतरांना (दयन्त) प्रदान करतात अथवा जे (गोनाम्) गायींच्या (ऊर्वम्) गोशाळेचे (दयन्त) रक्षण करतात (असे सर्व सज्जन विद्वज्जन तुमचे प्रिय होऊ द्या. त्यांना तुमचे प्रेम लाभू द्या.) ।।४।।
Essence
जे विद्वान श्रद्धाळू लौकिक आणि आध्यात्मिक आदी सर्व प्रकारचे धन उपार्जित करून (कीर्ती व संपत्ती मिळवून) स्वत: सत्पात्र होऊन इतरांचेही नियंत्रण करतात. (त्यांना कुमार्गापासून वाचवतात, स्वत:चे आणि इतरांचे इंद्रियदोष दूर करतात. वेदवाणीचा प्रसार करतात आणि अमृतरस देणाऱ्या गायींची रक्षा करतात, तेच लोक परमेश्वराचे प्रिय होतात. ।।४।।
Subject
आता कोण मनुष्य परमेश्वराला प्रिय होतात, हे सांगतात -