Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 367

733 Mantra
Devata- उषाः Rishi- प्रस्कण्वः काण्वः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
व꣡य꣢श्चित्ते प꣣तत्रि꣡णो꣢ द्वि꣣पा꣡च्चतु꣢꣯ष्पादर्जुनि । उ꣢षः꣣ प्रा꣡र꣢न्नृ꣣तू꣡ꣳरनु꣢꣯ दि꣣वो꣡ अन्ते꣢꣯भ्य꣣स्प꣡रि꣢ ॥३६७॥

व꣡यः꣢꣯ । चि꣣त् । ते । पतत्रि꣡णः꣢ । द्वि꣣पा꣢त् । द्वि꣣ । पा꣢त् । च꣡तु꣢꣯ष्पात् । च꣡तुः꣢꣯ । पा꣣त् । अर्जुनि । उ꣡षः꣢꣯ । प्र । आ꣣रन् । ऋतू꣢न् । अ꣡नु꣢꣯ । दि꣣वः꣢ । अ꣡न्ते꣢꣯भ्यः । परि꣢꣯ ॥३६७॥

Mantra without Swara
वयश्चित्ते पतत्रिणो द्विपाच्चतुष्पादर्जुनि । उषः प्रारन्नृतूꣳरनु दिवो अन्तेभ्यस्परि ॥

वयः । चित् । ते । पतत्रिणः । द्विपात् । द्वि । पात् । चतुष्पात् । चतुः । पात् । अर्जुनि । उषः । प्र । आरन् । ऋतून् । अनु । दिवः । अन्तेभ्यः । परि ॥३६७॥

Samveda - Mantra Number : 367
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 4; Ardh Prapathak » 2; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 4; Khand » 2;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (अर्जुनि) जनमानसात प्रकट होणारी शुभ्र सत्वगुणप्रधान अध्यात्म - प्रभा, (दिवः) आत्मलोकाच्या (अन्तेभाः परि) प्रदशातून (ते) तुझे (ऋतून् अनु) आगमन झाल्यानंतर (पतत्रिपाः) (वयः चित्) प्रबळ पंख असणाऱ्या पक्ष्याप्रमाणे (पतत्रिणः) उत्क्रमणशील (उंच उंच जाणारे) म्हणजे शरीराच्या निम्न भागातील मूलाधार चक्रा (गुदद्वारा) पासून वरच्या वरच्या चक्राकडे प्राणशक्ती नेणारे योगीजन (तुझ्यामुळे प्रेरित होतात) तसेच (द्विपात्) अपरा व परा या दोन प्राप्तव्य पदार्थ अथवा ज्ञान कर्म रूप दोन मंतव्य स्थान अथवा अभ्युदय- निःश्रेयस या दोन रूपाचे मार्ग (यांना प्राप्त करण्यासाठी योगीजन वा मनुष्य प्रयत्नशील होतात.) तसेच (हे अध्यात्मप्रभान तुझ्यामुळे) (चतुष्यात्) मन, बुद्धी, चित्र, अहंकार ही अंतःकरणचुष्ट्य साधने असलेले अथवा सुख, दुःख, पुण्य, पाप विषय असलेले मैत्री, करुणा, मुदित्य, उपेक्षा या चार वृत्ती ज्यांच्या चित्त - प्रसादनाचे उपाय आहेत. (ते योगीजन तुझ्यामुळे प्रेरणा प्राप्त करतात) अथवा बाह्य आभ्यन्तर स्तम्भवृत्ती - बाह्यान्तर विषयादोषी या चार प्रकारचे प्राणायाम ज्या योगीजनांसाठी प्रकाश आवरम क्षयाचे उपाय आहेत अथवा धर्म - अर्थ - काम - मोक्ष या चार पुरुषार्थांचा अवलंब करणारे ते मनुष्य आहेत, ते हे आत्मप्रभा, हे उषा, तुझ्या आगमनामुळे स्व कार्यात तत्पर होतात.।। ८।।
Essence
जसे प्रभातकाळी उषा विकसित झाल्यामुळे पक्षधारी पक्षी, द्विपाय मनुष्य आणि चतुष्पाद पशू झोप झटकून सक्रीय व प्रयत्नशील होतात, त्याचे आध्यात्मिक उषेच्या हृदयी उदय झाल्यानंतर योगमार्गात प्रवृत्त पुढे जाणारे उद्यमशील जन, दोन साधन वा चार साधन असलेले योगीजन आपल्या हृदयाकाश वा जनमानसात अध्यात्म- सूर्याच्या उदयासाठी उद्युक्त होतात.।। ८।।
Subject
उषः देवता। निसर्गातील उषेप्रमाणए आध्यात्मिक उषेचा जेव्हा अंतः करणात प्रादुर्भाव होतो, तेव्हा कोण काम करतो...
Special
या मंत्रातील ‘वयः चित् पतत्रिणः’ या वाक्यात श्लिष्टोपमा अलंकार आहे.।। ८।।