Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 364

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- प्रियमेध आङ्गिरसः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
वि꣣श्वा꣡न꣢रस्य व꣣स्प꣢ति꣣म꣡ना꣢नतस्य꣣ श꣡व꣢सः । ए꣡वै꣢श्च चर्षणी꣣ना꣢मू꣣ती꣡ हु꣢वे꣣ र꣡था꣢नाम् ॥३६४॥

वि꣣श्वा꣡न꣢रस्य । वि꣣श्व꣢ । नर꣣स्य । वः । प꣡ति꣢꣯म् । अ꣡ना꣢꣯नतस्य । अन् । आ꣣नतस्य । श꣡व꣢꣯सः । ए꣡वैः꣢꣯ । च꣣ । चर्षणीना꣢म् । ऊ꣣ती꣢ । हु꣣वे । र꣡था꣢꣯नाम् ॥३६४॥

Mantra without Swara
विश्वानरस्य वस्पतिमनानतस्य शवसः । एवैश्च चर्षणीनामूती हुवे रथानाम् ॥

विश्वानरस्य । विश्व । नरस्य । वः । पतिम् । अनानतस्य । अन् । आनतस्य । शवसः । एवैः । च । चर्षणीनाम् । ऊती । हुवे । रथानाम् ॥३६४॥

Samveda - Mantra Number : 364
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 4; Ardh Prapathak » 2; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 4; Khand » 2;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(प्रथम अर्थ) (परमात्मपर अर्थ)- हे इंद्र जगदीश्वर, (विश्वानरस्य) सर्व जगाचे संचालक, (अनामतस्य) कुठेही कधीही न वाकणारे अर्थात पराजित न होणारे तसेच (शवसः) शक्तीचे (पतिम्) हे अधीश्वर, (चर्षणीनाम्) मनुष्यांच्या (एवैः) सत्कामनांच्या पूर्ततेसाठी आणि (रथानाम्) त्यांच्या शरीररूप रथांना (ऊती) लक्ष्याकडे प्रेरित करण्यासाठी व रक्षणासाठी मी (एक उपासक) (वः) आपणास (हुवे) पुकारत आहे.।।
द्वितीय अर्थ - (राजापर अर्थ) हे राजा, (विश्वानरस्य) सर्वांच्या पुढे जाणारी (अनानतस्य) कोणाहीसमोर न वाकणारी म्हणजे सदा अपराजित अशा (शवसः) सेनेचे जे (पतिम्) स्वामी, असा (वः) आपणास (चर्षणीनाम्) प्रजेच्या (एवैः) महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी व प्रारब्ध कार्यांच्या पूर्तीसाठी आणि (रथानाम्) विमान आदी मान (ऊती) चालविण्यासाठी (वैमानिक व सैन्याधिकाऱ्यांकडून संचालन करून घेण्यासाठी) मी (एक प्रजाजन) आपणास (हुवे) हाक देत आहे.।। ५।।
Essence
जगदीश्वरच जीवनयात्रेसाठी जीवात्म्यांना त्यांच्या त्यांच्या कर्मांप्रमाणए उत्कृष्ट वा अन्यथा शरीररथ प्रदान करतो. त्याचप्रमाणे राजानेही प्रजाजनांना प्रवास शीग्र करता यावा, यासाठी विमान आदी रथांची निर्मिती केली पाहिजे.।। ५।।
Subject
बळाधिपती परमेश्वराला व नृपतीला आवाहन
Special
या मंत्रात श्लेष अलंकार आहे.।। ५।।