Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 363

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- मधुच्छन्दा वैश्वामित्रः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
उ꣣क्थ꣡मिन्द्रा꣢꣯य꣣ श꣢ꣳस्यं꣣ व꣡र्ध꣢नं पुरुनि꣣ष्षि꣡धे꣢ । श꣣क्रो꣡ यथा꣢꣯ सु꣣ते꣡षु꣢ नो रा꣣र꣡ण꣢त्स꣣ख्ये꣡षु꣢ च ॥३६३॥

उ꣣क्थ꣢म् । इ꣡न्द्रा꣢꣯य । शँ꣡स्य꣢꣯म् । व꣡र्ध꣢꣯नम् । पु꣣रुनि꣣ष्षि꣡धे꣢ । पु꣣रु । निष्षि꣡धे꣢ । श꣣क्रः꣢ । य꣡था꣢꣯ । सु꣣ते꣡षु꣢ । नः꣣ । रार꣡ण꣢त् । स꣣ख्ये꣡षु꣢ । स꣣ । ख्ये꣡षु꣢꣯ । च꣣ ॥३६३॥

Mantra without Swara
उक्थमिन्द्राय शꣳस्यं वर्धनं पुरुनिष्षिधे । शक्रो यथा सुतेषु नो रारणत्सख्येषु च ॥

उक्थम् । इन्द्राय । शँस्यम् । वर्धनम् । पुरुनिष्षिधे । पुरु । निष्षिधे । शक्रः । यथा । सुतेषु । नः । रारणत् । सख्येषु । स । ख्येषु । च ॥३६३॥

Samveda - Mantra Number : 363
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 4; Ardh Prapathak » 2; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 4; Khand » 2;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
पुत्र, पत्नी, मित्रादीसह (पुरुनिष्षिधे) अनेकांचा पाप- पंकापासून अथवा संकटापासून उद्धार करणाऱ्या (इंद्राव) त्या परम उपदेशक परमेस्वरासाठी अशा प्रकारच्या (उक्थम्) स्तोत्राचे (शस्यम्) गायन केले पाहिजे की जे आम्हा स्तोताजनांची (वर्धनम्) वृद्धी वा उत्कर्ष साधणारे असेल (तसेच ते गान असे मनापासून गेले असावे की (यथा) ज्यामुळे (शक्रः) तो सर्व शक्तिमान परमेश्वर (नः) आम्हा उपासकांच्या (सुतेषु) पुत्रांना (सक्येषुच) आणि मित्रांना (रारणत्) पुन्हा पुन्हा प्रेरणापूर्ण उपदेश देत राहील.।। ४।।
Essence
त्याची स्तुती व प्रार्थना केल्यामुळे परमेश्वर स्तोताजनांना तसेच त्यांच्या पुत्र, मित्रादींना पुरुषार्थ करण्याची सत्प्रेरणा देऊन व त्यांना सदुपदेश (मानसिक सुविचार) देऊन त्यांचे उत्कर्ष घडवितो.।। ४।।
Subject
कोणत्या प्रयोजनामुळे इंद्राची कोणत्या स्तोत्राद्वारे स्तुती करावी ?