Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 36

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- भर्गः प्रागाथः Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
पा꣣हि꣡ नो꣢ अग्न꣣ ए꣡क꣢या पा꣣ह्यू꣡३꣱त꣢ द्वि꣣ती꣡य꣢या । पा꣣हि꣢ गी꣣र्भि꣢स्ति꣣सृ꣡भि꣢रूर्जां पते पा꣣हि꣡ च꣢त꣣सृ꣡भि꣢र्वसो ॥३६॥

पा꣣हि꣢ । नः꣣ । अग्ने । ए꣡क꣢꣯या । पा꣣हि꣢ । उ꣣त꣢ । द्वि꣣ती꣡य꣢या । पा꣣हि꣢ । गी꣣र्भिः꣢ । ति꣣सृ꣡भिः꣢ । ऊ꣣र्जाम् । पते । पाहि꣢ । च꣣तसृ꣡भिः꣢ । व꣣सो ॥३६॥

Mantra without Swara
पाहि नो अग्न एकया पाह्यू३त द्वितीयया । पाहि गीर्भिस्तिसृभिरूर्जां पते पाहि चतसृभिर्वसो ॥

पाहि । नः । अग्ने । एकया । पाहि । उत । द्वितीयया । पाहि । गीर्भिः । तिसृभिः । ऊर्जाम् । पते । पाहि । चतसृभिः । वसो ॥३६॥

Samveda - Mantra Number : 36
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 4;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
प्रथम अर्थ (परमात्मपूरक) - हे (ऊर्जा पते) अन्न, रस, बळ आणि प्राण यांचे अधिपती (वसो) सर्वत्र वास्तव्य असणारे सर्वान्तर्यामी आणि निवासप्रदायक (अग्ने) परमात्मन्, आपण (न:) आमची (एकया) एकऋक् रूप वाणीद्वारे (रक्ष) रक्षा करा (उत्) आणि (द्वितीयया) दुसऱ्या म्हणजे यजु:रूप वाणीद्वारे (पाहि) रक्षण करा (तिसृभि:) तीन म्हणजे ऋग्, यजु: आणि साम या सन्मिलित (गीर्भि:) वाणीद्वारे (पण्हि) रक्षा करा. (चतसृभि:) चार म्हणजे ऋग्, यजु:, साम आणि अथर्व या चार वाणीद्वारे (पाहि) आमचे रक्षण करा. या मंत्रात चार वेळा पाहि शब्दाच्या प्रयोगाने परमेश्वराद्वारे मिळणाऱ्या रक्षणाची आवश्यकता व नैरन्तर्य व्यक्त होत आहे. ।।
द्वितीय अर्थ : (विद्वत्परक) (उर्जा पते) सामर्थ्या आमचे पालन करणारे (वसो) (विद्यार्थ्यांना) उत्तम निवासस्थान देणारे (अग्ने) अग्निवत् विद्याप्रकाशाने समृद्ध हे विद्वान, आपण (एकया) एका उत्तम शिक्षण वा विद्येने (न;) आमचे (पाहि) रक्षण करा. (ठत) आणि (द्वितीयया) दुसऱ्या विद्येने म्हणजे अध्यापन क्रियेने (पाहि) रक्षण करा (विसृभि:) कर्मकांड, उपासनाकांड व ज्ञानकांड या तीन विषयांचे ज्ञान देणाऱ्या (गीर्भि:) वाणी वा उपदेशाद्वारे आमचे (पाहि) खूण करा. (चतसृभि:) चार पुरुषार्थ म्हणजे धर्म, अर्थ, काम व मोक्ष यांचे ज्ञान देणाऱ्या चार प्रकारच्या वाणीद्वारे आमचे (पाहि) रक्षण करा. ।।२।।
Essence
परमेश्वराने चार वेद आमच्या हिताकरीता प्रदान केले आहेत. जर आम्ही वेदवर्णित ज्ञान, कर्म, उपासना व विज्ञान या विषयांचे ज्ञान संपादित करून आपल्या कर्तव्य कर्मांचे आचरण करू. तर अवश्यमेव आमचे रक्षण होईल. विद्वानांचे कर्तव्य आहे की, आम्हास वेदांचे अध्यापन करून वेदविहित धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांचा उपदेश देऊन आमची रक्षा करावी. ।।२।।
Subject
पुढील मंत्रात परमेश्वराला व विद्वानाला प्रार्थना केली आहे. -