Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 351

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- तिरश्चीराङ्गिरसः शंयुर्बार्हस्पत्यो वा Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
यो꣢ र꣣यिं꣡ वो꣢ र꣣यि꣡न्त꣢मो꣣ यो꣢ द्यु꣣म्नै꣢र्द्यु꣣म्न꣡व꣢त्तमः । सो꣡मः꣢ सु꣣तः꣡ स इ꣢꣯न्द्र꣣ ते꣡ऽस्ति꣢ स्वधापते꣣ म꣡दः꣢ ॥३५१॥

यः꣢ । र꣣यि꣢म् । वः꣣ । रयि꣡न्त꣢मः । यः । द्यु꣣म्नैः꣢ । द्यु꣣म्न꣡व꣢त्तमः । सो꣡मः꣢꣯ । सु꣣तः꣢ । सः । इ꣣न्द्र । ते । अ꣡स्ति꣢꣯ । स्व꣣धापते । स्वधा । पते । म꣡दः꣢꣯ ॥३५१॥

Mantra without Swara
यो रयिं वो रयिन्तमो यो द्युम्नैर्द्युम्नवत्तमः । सोमः सुतः स इन्द्र तेऽस्ति स्वधापते मदः ॥

यः । रयिम् । वः । रयिन्तमः । यः । द्युम्नैः । द्युम्नवत्तमः । सोमः । सुतः । सः । इन्द्र । ते । अस्ति । स्वधापते । स्वधा । पते । मदः ॥३५१॥

Samveda - Mantra Number : 351
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 4; Ardh Prapathak » 2; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 3; Khand » 12;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(रयिन्तमः) अतिशय ऐश्वर्यवान (यः) जो (वः) तुम्हाला (रयिम्) ऐश्वर्य देतो आणि (द्युम्नवत्तमः) अतिशय तेजस्वी (यः) जो (द्युम्नैः) तेजाने तुम्हाला अलंकृत करणे (ज्ञः) तो (सुतः) हृदयात प्रकट झालेला (सोमः) चंद्राप्रमाणे आल्हाददायक आणि सोम औषधीप्रमाणे रसांचे आगर असलेला परमेश्वर, (स्वधापते) अन्नांचे स्वामी म्हणजे अन्नादी सांसारिक पदार्थांचा भोक्ता असलेले हे विद्वान, तो परमेश्वर (ते) तुमच्यासाठी मदः) आनंददायक (अस्त) आहे.।।१०।।
Essence
या मंत्रात ‘रयिं, रयिं’मध्ये लाटानुप्रास आहे. ‘तमो तमः’ व ‘द्युम्नै, द्युम्न’मध्ये छेकानुप्रास आहे. य्, स्, त् आणि म् या वर्णांची वेगवेगळ्या ठिकाणी अनेक वेळा आवृत्ती असल्यामुळे वृत्त्यनुप्रास अलंकार आहे. ।। १०।।
Subject
परमेश्वर आनंदकारी आहे -
Special
हृदयात प्रकट झालेला ईश्वर योगी व्यक्तीला समस्त आध्यात्मिक ऐश्वर्य, ब्रह्मवर्चस् आणि आनंद प्रदान करतो. म्हणून सर्वांनी यत्नपूर्वक त्याचा साक्षात्कार केला पाहिजे.।। १०।।
या दशतीमध्ये इंद्राच्या महिमेचे गायन, त्याच्याप्रत श्रद्धा - रस आदींचे अर्पण, त्याच्याकडून ऐश्वर्याची याचना, त्याचे आवाहन व त्याची स्तुतिविषयी प्रेरणा केली असल्यामुळे या दशतीतील विषयांची संगती मागील दशतीच्या विषयांशी आहे, असे जाणावे.।।
चतुर्थ प्रपाठकातील द्वितीय अर्धाची प्रथम दशती समाप्त.
तृतीय अध्यायातील बारावा खंड समाप्त.
इथे तृतीय अध्याय समाप्त.