Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 311

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- नृमेध आङ्गिरसः Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
त्व꣡मि꣢न्द्र꣣ प्र꣡तू꣢र्तिष्व꣣भि꣡ विश्वा꣢꣯ असि꣣ स्पृ꣡धः꣢ । अ꣣शस्तिहा꣡ ज꣢नि꣣ता꣡ वृ꣢त्र꣣तू꣡र꣢सि꣣ त्वं꣡ तू꣢र्य तरुष्य꣣तः꣢ ॥३११॥

त्व꣢म् । इ꣣न्द्र । प्र꣡तू꣢꣯र्तिषु । प्र । तू꣣र्त्तिषु । अभि꣢ । वि꣡श्वाः꣢꣯ । अ꣣सि । स्पृ꣡धः꣢꣯ । अ꣣शस्तिहा꣢ । अ꣣शस्ति । हा꣢ । ज꣣निता꣢ । वृ꣣त्रतूः꣢ । वृ꣣त्र । तूः꣢ । अ꣣सि । त्व꣢म् । तू꣣र्य । तरुष्य꣢तः ॥३११॥

Mantra without Swara
त्वमिन्द्र प्रतूर्तिष्वभि विश्वा असि स्पृधः । अशस्तिहा जनिता वृत्रतूरसि त्वं तूर्य तरुष्यतः ॥

त्वम् । इन्द्र । प्रतूर्तिषु । प्र । तूर्त्तिषु । अभि । विश्वाः । असि । स्पृधः । अशस्तिहा । अशस्ति । हा । जनिता । वृत्रतूः । वृत्र । तूः । असि । त्वम् । तूर्य । तरुष्यतः ॥३११॥

Samveda - Mantra Number : 311
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 4; Ardh Prapathak » 1; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 3; Khand » 8;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (इन्द्र) शूरवीर परमेश्वर वा राजा, (त्वम्) तुम्ही (प्रतूर्तिषु) ज्यात फार मारामारी होते, अशा देवासुर- संग्रामामध्ये (विश्वा) सर्व (स्पृधः) स्पर्धक शत्रु-सैन्याला (अभि असि) पराभूत करता. तुम्ही (अशास्तिहा) अप्रशस्ति वा निंदा दूर करणारे (आम्हाला निंदेपासून वाचविणारे) असून (जमिता) प्रशंसनीय सद्गुण व सच्चारित्र्याची राष्ट्रात वा हृदयात स्थापना करणारे आहात. तसेच आपण (वृक्षतूः) पापाचा व पापी मनुष्याचा वध करणारे (अति) आहात. (त्वम्) आपण (तरुष्यतः) हिंसकांची (तूर्य( हिंसा करा. ।। ९।।
Essence
जसे परमेश्वर मानस देवासुर- संग्रामामध्ये काम, क्रोध आदी असुरांचा पराभव करून, अप्रशस्ति (निंदा) दूर करून प्रशस्ति देणाऱ्या श्रेष्ठ गुण, कर्म, स्वभाव उत्पन्न करतो आणि पापांचे निर्मूलन करून स्तुतिकर्त्याची कीर्ती वाढवितो. तद्वत राजानेदेखील राष्ट्राच्या आंतरिक व बाह्य शत्रूंचे निर्मूलन करून राष्ट्राची अप्रशस्ती दूर करून प्रजेत सद्गुण व सदाचार यांचा प्रसार केला पाहिजे व राज्यात सुव्यवस्था करून राष्ट्राची व स्वतःची कीर्ती वाढविली पाहिजे.।। ९।।
Subject
इंद्र नावाने परमेश्वर आणि राजा यांना रिपुसंहारासाठी प्रार्थना -
Special
या मंत्रात अर्थश्लेष अलंकार असून कारणाने कार्यांचे समर्थन असल्यामळे अर्थान्त रन्यास अलंकारदेखील आहे. ‘तूर’ची तीन वेळा आवृत्ती असल्यामुळे तसेच ‘त’ वर्णाची अकरा वेळा आवृत्ती असल्यामुळे वृत्त्यनुप्रास अलंकारही आहे. परमात्मा आणि राजा यांमध्ये उपमानोपमेय भाव व्यंजित आहे. ।। ९।।