Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 309

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- वसिष्ठो मैत्रावरुणिः Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
अ꣣भी꣢ष꣣त꣢꣫स्तदा भ꣣रे꣢न्द्र꣣ ज्या꣢यः꣣ क꣡नी꣢यसः । पु꣣रूव꣢सु꣣र्हि꣡ म꣢घवन्ब꣣भू꣡वि꣢थ꣣ भ꣡रे꣢भरे च꣣ ह꣡व्यः꣢ ॥३०९॥

अ꣣भि꣢ । स꣣तः꣢ । तत् । आ । भ꣣र । इ꣡न्द्र꣢꣯ । ज्या꣡यः꣢꣯ । क꣡नी꣢꣯यसः । पु꣣रूव꣡सुः꣢ । पु꣣रु । व꣡सुः꣢꣯ । हि । म꣣घवन् । बभू꣡वि꣢थ । भ꣡रे꣢꣯भरे । भ꣡रे꣢꣯ । भ꣣रे । च । ह꣡व्यः꣢꣯ ॥३०९॥

Mantra without Swara
अभीषतस्तदा भरेन्द्र ज्यायः कनीयसः । पुरूवसुर्हि मघवन्बभूविथ भरेभरे च हव्यः ॥

अभि । सतः । तत् । आ । भर । इन्द्र । ज्यायः । कनीयसः । पुरूवसुः । पुरु । वसुः । हि । मघवन् । बभूविथ । भरेभरे । भरे । भरे । च । हव्यः ॥३०९॥

Samveda - Mantra Number : 309
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 4; Ardh Prapathak » 1; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 3; Khand » 8;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(प्रथम अर्थ) (उपास्य- उपासक पर) - हे (इन्द्र) परमेश्वर (कवीयसः सतः) तुमच्यापेक्षा किती तीर अल्प शक्तिमान व अल्प धनवान अशा मला (तत्) तुमच्याजवळ असलेले ते (ज्यायः) अतिश प्रशस्त, अत्यंत महान आध्यात्मिक धन व शक्ती (अभि आभर) द्या. हे (मघवन्) प्रशस्त ऐश्वर्यवान परमेश्वर, तुम्ही (पुरुवसुः) अत्यंत संपत्तिशाली (बभूविथ) आहात. श्रभरे भरे च) प्रत्येक अंतर्द्वन वेळी प्रत्येक देवासुर- संग्रामात, प्रत्येक संकटात विजय वा यश प्राप्त करण्याची आम्ही तुम्हाला (हव्यः) हाक द्यावी. तुम्ही सेच आहात.।।
द्वितीय अर्थ - (गुरू- शिष्यपर) - हे (इन्द्र) दोषविदारक आणि उपदेश प्रदायक आचार्यवर, (कानीयसः सतः) मी तुमचा शिष्य वय आणि ज्ञान यामध्ये तुमच्यापेक्षा किती तरी कमी आहे, म्हणून मला (तत्) तुमच्याकडे असलेले ते (ज्यायः) प्रशंसनीय विशाल ज्ञान आणि शिष्यासाठी व्रतपालराची रीती आम्हास (अभि आ भर) पूर्णतः भरा (द्या) (हि) कारण की हे (मघवन्) ज्ञानरूप धनाचे स्वामी, आपण (पुरुवसुः) अनेक विद्या पारंगत (बभूविथ) आहात. तसेच (भरे भरे च) शिष्यांना कोणतेही (कर्तव्य, व्रत, विद्याभ्यासाचे) भार सहज उचलता यावे, यासाठी तुम्ही आम्हाला (हव्यः) ग्रहणीय आहात.।।
तृतीय अर्थ - (राजा-प्रजापर) - हे (इन्द्र) शत्रुविदारक, सुख प्रदायक राजा, (कामीयसः) सतः) धन, वीरल आदींविषयी तुमच्यापेक्षा खूपच कमी असलेला मी एक तुमचा प्रजाजन, मला (तत्) ते स्पृहणीय, प्रसिद्ध (ज्यायः) प्रशस्त व विशाल धन-धान्य, शस्त्रास्त्र, कला-कौशल्य, सुराज्य आदींचे ऐश्वर्य (अग्नि आ भर) प्रदान करा. हे (मघवन्) ऐश्वर्यशाली राजा, तुम्ही (पुरुवसुः) अनेक प्रजाजनांना निवासादी सोयी (बभूविथ) देणारे आहात. तसेच (भरे भरे च) राष्ट्रामध्ये आतील व बाह्य जे शत्रू आहेत, त्यांच्याशी होणाऱ्या संघर्ष वा युद्धाच्या वेळी (हव्यः) हाक द्यावी, असे आहात.।। ७।।
Essence
लहान पात्रात मोठी वस्तू मावू शकत नाही. त्यामुळे ङ्गज्यायः कनीयसःफ या कथनात वैषम्य असल्यामुळे इथे विषयालंकार हा व्यंड्व्य आहे. ।। ७।।
Subject
इंद्र नावाने परमेश्वर, गुरू राजा यांच्याकडून ऐश्वर्याची याचना -
Special
लहान पात्रात मोठी वस्तू मावू शकत नाही. त्यामुळे ङ्गज्यायः कनीयसःफ या कथनात वैषम्य असल्यामुळे इथे विषयालंकार हा व्यंड्व्य आहे. ।। ७।।