Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 306

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- प्रस्कण्वः काण्वः Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
अ꣣यं꣢ वां꣣ म꣡धु꣢मत्तमः सु꣣तः꣢꣫ सोमो꣣ दि꣡वि꣢ष्टिषु । त꣡म꣢श्विना पिबतं ति꣣रो꣡अ꣢ह्न्यं ध꣣त्त꣡ꣳ रत्ना꣢꣯नि दा꣣शु꣡षे꣢ ॥३०६॥

अ꣣य꣢म् । वा꣣म् । म꣡धु꣢꣯मत्तमः । सु꣣तः꣢ । सो꣡मः꣢꣯ । दि꣡वि꣢꣯ष्टिषु । तं । अ꣣श्विना । पिबतम् । तिरो꣡अ꣢ह्न्यम् । ति꣣रः꣢ । अ꣣ह्न्यम् । धत्त꣢म् । र꣡त्ना꣢꣯नि । दा꣣शु꣡षे꣢ ॥३०६॥

Mantra without Swara
अयं वां मधुमत्तमः सुतः सोमो दिविष्टिषु । तमश्विना पिबतं तिरोअह्न्यं धत्तꣳ रत्नानि दाशुषे ॥

अयम् । वाम् । मधुमत्तमः । सुतः । सोमः । दिविष्टिषु । तं । अश्विना । पिबतम् । तिरोअह्न्यम् । तिरः । अह्न्यम् । धत्तम् । रत्नानि । दाशुषे ॥३०६॥

Samveda - Mantra Number : 306
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 4; Ardh Prapathak » 1; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 3; Khand » 8;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (अश्विना) आत्मा व मनरूप अथवा अध्यापक- उपदेशक रूप अश्वी देवहो, (दिविष्टम्) अध्यात्म - दीप्तीच्या यज्ञात अथवा आचरण- यज्ञात (अयम्) हा (मघुत तमः) अत्यंत मधुर (सोमः) ज्ञान, कर्म, श्रद्धा, शांती आदींचा रस अथवा सोम आदी औषधींचा रस (वाम्) मी तुमच्यासाठी (सुतः) तयार केला आहे. (तिरो अहृयम्) पावित्र्यात जे दिवसालादेखील लाजवील अशा उज्ज्वल दिवसाहून पवित्र दिवसात तुम्ही (तम्) तो रस (पिवलम्) प्या आणि (दाशुषे) दान देणाऱ्या जो मी, अशा यजमानासाठी (रत्नानि) उत्कृष्ट प्रेरणा, उत्कृष्ट संकल्प उत्कृष्ट ज्ञान, उत्कृष्ट उपदेश आदी बहुमूल्य रमणीय धन (धत्तम्) प्रदान करा. ।। ४।।
Essence
मनाच्या शिव संकल्पानुसार जीवात्मा जे ज्ञान, कर्म, श्रद्धा वा भक्ती परमात्म्याप्रत अर्पित करतो, ते सर्व त्याला अत्यंत फलदायी होते. याच प्रकारे राष्ट्रात अध्यापक आणि उपदेशकांचा मथोचित सत्कार केल्यामुळे त्यांच्याकडून अधिकाधिक ज्ञान, विज्ञानादीची प्राप्ती होऊ शकते. ।। ४।।
Subject
इन्द्र परमेश्वराने अधिष्ठित आत्मा व मन रूप अश्विनांना आणि इन्द्र राजाने अधिष्ठित अध्यापक- उपदेशक रूप अश्विनांना याचना केली आहे. -
Special
या मंत्रात श्लेष अलंकार आहे. ।। ४।।