Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 303

733 Mantra
Devata- उषाः Rishi- वसिष्ठो मैत्रावरुणिः Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
प्र꣡त्यु꣢ अदर्श्याय꣣त्यू꣢३꣱च्छ꣡न्ती꣢ दुहि꣣ता꣢ दि꣣वः꣢ । अ꣡पो꣢ म꣣ही꣡ वृ꣢णुते꣣ च꣡क्षु꣢षा꣣ त꣢मो꣣ ज्यो꣡ति꣢ष्कृणोति सू꣣न꣡री꣢ ॥३०३॥

प्र꣡ति꣢꣯ । उ꣣ । अदर्शि । आयती꣢ । आ꣣ । यती꣢ । उ꣣च्छ꣡न्ती꣢ । दुहि꣣ता꣢ । दि꣣वः꣢ । अ꣡प꣢꣯ । उ꣣ । मही꣢ । वृ꣣णुते । च꣡क्षु꣢꣯षा । त꣡मः꣢ । ज्यो꣡तिः꣢꣯ । कृ꣣णोति । सून꣡री꣢ । सु꣣ । न꣡री꣢꣯ ॥३०३॥

Mantra without Swara
प्रत्यु अदर्श्यायत्यू३च्छन्ती दुहिता दिवः । अपो मही वृणुते चक्षुषा तमो ज्योतिष्कृणोति सूनरी ॥

प्रति । उ । अदर्शि । आयती । आ । यती । उच्छन्ती । दुहिता । दिवः । अप । उ । मही । वृणुते । चक्षुषा । तमः । ज्योतिः । कृणोति । सूनरी । सु । नरी ॥३०३॥

Samveda - Mantra Number : 303
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 4; Ardh Prapathak » 1; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 3; Khand » 8;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(आयती) येत असलेली (उच्छन्ती) उदित होत असलेली ही (दिवः दुहिता) द्यूलोकाची पुत्री उषा (प्रति) (अदर्शि उ) समोर दिसत आहे. (मही) महती ही उषा (चदुषा) दर्शन घेऊन (येऊन) (तमः अंधकार (अप उ वृणुते) दूर करीत आहे. (सूनरी) सुनेत्री (वा डोक्याला सुख देणारी ही उषा (ज्योतिः) ज्योती (कृणोति) उत्पन्न करीत आहे. ।। १।।
Essence
जसे सूर्योदयापूर्वी सर्वत्र व्याप्त अंधकाराला छिन्न भिन्न करीत निसर्गातील उषेचा प्रकाश सर्वत्र पसरतो, तसेच परमेश्वर रूप सूर्याच्या उदयाने पूर्व मनोभूमीत व्याप्त तामसिक वृत्तीचे पाश छिन्न भिन्न होतात आणि आध्यात्मिक उषेचा प्रकाश आत्म्यात व्याप्त होतो. ही उषा योग मार्गात ‘ऋतम्भरा प्रज्ञा’ या नावाने प्रसिद्ध आहे. ।। १।।
Subject
प्रथम मंत्राची देवता उषा आहे. या मंत्रात उषेच्या आगमनाचे वर्णन आहे -
Special
या मंत्रात स्वभावोक्ति अलंकार आहे. येथे प्राकृतिक उषेव्या वर्णनातून आध्यात्मिक उमेचा अर्थ ध्वनित होत आहे. ।। २।।