Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 292

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- मेधातिथि0मेध्यातिथी काण्वौ Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
व꣡स्या꣢ꣳ इन्द्रासि मे पि꣣तु꣢रु꣣त꣢꣫ भ्रातु꣣र꣡भु꣢ञ्जतः । मा꣣ता꣡ च꣢ मे छदयथः स꣣मा꣡ व꣢सो वसुत्व꣣ना꣢य꣣ रा꣡ध꣢से ॥२९२

व꣡स्या꣢न् । इ꣢न्द्र । असि । मे । पितुः꣢ । उ꣢त꣢ । भ्रा꣡तुः꣢ । अ꣡भु꣢ञ्जतः । अ । भु꣢ञ्जतः । माता꣢ । च꣢ । मे । छदयथः । समा꣢ । स꣢ । मा꣢ । व꣢सो । वसुत्वना꣡य꣢ । रा꣡ध꣢से ॥२९२॥

Mantra without Swara
वस्याꣳ इन्द्रासि मे पितुरुत भ्रातुरभुञ्जतः । माता च मे छदयथः समा वसो वसुत्वनाय राधसे ॥२९२

वस्यान् । इन्द्र । असि । मे । पितुः । उत । भ्रातुः । अभुञ्जतः । अ । भुञ्जतः । माता । च । मे । छदयथः । समा । स । मा । वसो । वसुत्वनाय । राधसे ॥२९२॥

Samveda - Mantra Number : 292
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 3; Ardh Prapathak » 2; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 3; Khand » 6;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (इन्द्र) परमेश्वरा, तू (अनुज्जतः) माझे पालन न करणाऱ्या (मे) माझ्या (पितुः) पित्यापेक्षा वा (भ्रातुः) सख्या भावापेक्षा (वस्यान्) अधिक प्रिय व आधारवत तूच माझ्या खरा पालक व तूच माझा खरा बंधू) (असि) आहेस. हे (वसो) निवासक जगदीश्वरा, तूच (मे) माझ्यासाठी (माता च) माते (समा) सारखा म्हणजे तूच माझा पिताव माता दोन्ही तूच आहेस. कारण तूच (वसुत्वनाय) धनासाठी आणि (राधसे) यशस्वितेसाठी (छदमयः) मला आम्हाला आपल्या आश्रयात घेऊन आनंदित करतोस. ।। १०।।
Essence
उपासकांसाठी जगदीश्वर सर्व सांसारिक बंधु- बांधवांपेक्षा अधिक अथवा सर्वाधिक प्रिय व श्रेष्ठ आहे. त्याची तुलना केवळ ‘माता’ या एका शब्दानेच होऊ शकते. शास्त्रात म्हटले आहे की माता ही भूमीपेक्षा गौरवमयी आहे. ।। १०।।
या दशतीमध्ये इंद्राचे गुणवर्णन आणि आवाहन आहे. त्यापासून बुद्धी आदींची प्रार्थना केली आहे. तसेच त्याच्याशी संबंधित अश्विनीकडून दानाची याचना केली असून राजा आदी चारित्र्याचेही वर्णन केले आहे. यामुळे या दशतीतील मंत्रांच्या अर्थाशी मागील दशतीच्या अर्थाची संगती आहे, असे जाणावे. ।।
तृतीय प्रपाठकातील द्वितीय अर्ध्यपैकी पाचवी दशती समाप्त.
तृतीय प्रपाठक समाप्त.
तृतीय अध्यायातील सहावा खंड समाप्त.
Subject
परमेश्वरच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहे -
Special
या मंत्रातील ‘अनुज्जतः’ या शब्दाद्वारे पिता व भ्रातापेक्षा इन्द्रच अधिक निवासक वा आश्रयदाता आहे, असा अर्थ व्यक्त होत आहे. तसेच ‘वसुत्वनाय राधसे छदमयः’ या वाक्याने ‘इंद्र हाच माता’ असा अर्थ सूचित होत आहे. यामुळे या दोन्ही ठिकाणी ङ्गकाव्यलिंगफ अलंकार आहे. ‘तुरू, तुर्’ आणि ‘वसो वसु’ येथे छेकानुप्रास आहे. ।। १०।।