Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 291

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- मेधातिथि0मेध्यातिथी काण्वौ Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
म꣣हे꣢ च꣣ न꣢ त्वा꣢द्रिवः꣣ प꣡रा꣢ शु꣣ल्का꣡य꣢ दीयसे । न꣢ स꣣ह꣡स्रा꣢य꣣ ना꣡युता꣢꣯य वज्रिवो꣣ न꣢ श꣣ता꣡य꣢ शतामघ ॥२९१॥

म꣣हे꣢ । च꣣ । न꣢ । त्वा꣣ । अद्रिवः । अ । द्रिवः । प꣡रा꣢꣯ । शु꣣ल्का꣡य꣢ । दी꣣यसे । न꣢ । स꣣ह꣡स्रा꣢य । न । अ꣣यु꣡ता꣢य । अ꣣ । यु꣡ता꣢꣯य । व꣣ज्रिवः । न꣢ । श꣣ता꣡य꣢ । श꣣तामघ । शत । मघ ॥२९१॥

Mantra without Swara
महे च न त्वाद्रिवः परा शुल्काय दीयसे । न सहस्राय नायुताय वज्रिवो न शताय शतामघ ॥

महे । च । न । त्वा । अद्रिवः । अ । द्रिवः । परा । शुल्काय । दीयसे । न । सहस्राय । न । अयुताय । अ । युताय । वज्रिवः । न । शताय । शतामघ । शत । मघ ॥२९१॥

Samveda - Mantra Number : 291
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 3; Ardh Prapathak » 2; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 3; Khand » 6;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(अद्रिवः) आनंद रूप मेघांचे स्वामी आणि आनंद रसाची वृष्टी करणाऱ्या हे इंद्र परमेश्वरा, (त्वा) तुला आम्ही (महेच) (शुल्काय) कितीही मोठ्या मूल्यावर (न) (परादीयसे) वेगळे वा दूर करू शकत नाही. (तुझ्या सामीप्यतेसाठी आम्ही कितीही मोठा त्याग करावयास तत्पर आहोत) हे (वज्रिवः) विज्ञानमयी नीती- नियमाप्रमाणे चालणाऱ्या परमेश्वरा, (न) (सहस्राय) हजार मुद्रा घेून अथवा (न) (अयुताय) दहा हजार मुद्रा घेून (म्हणजे काहीही झाले तरीही) तुला आम्ही सोडू शकत नाही. हे (शतामघ) अनंत संपदावान परमेश्वरा, (न) (शताय) दहा हजारांपेक्षा शतगुण म्हणजे दश लक्ष मुद्राएवढे मूल्य देऊनदेखील कोणी तुला आमच्यापासून दूर करीत असेल, तर ते आम्हाला नको. ।। ९।।
Essence
या मंत्रात ‘अद्रिवः’ ‘वज्रिवः’ ‘शतामघ’ ही तीनही विशेषणे एकाच परमेश्वराची पण साभिप्राय अशी वापरली आहेत. म्हणून येथे ‘परिकर’ अलंकार आहे. जो परमेश्वर मेघवत् सुखवर्षक निश्चित नियमांप्रमाणे चालणारा आणि अनंत धनवान आहे. तो कितीही मोठी किंमत मिळाली, तरीही सोडण्यासारखा आहे काय ? ।। ९।।
Subject
परमेश्वराची साथ कधीही सोडू नये. काही झाले तरीही.
Special
हे राजराजेश्वर परमेश्वरा, आम्ही उपासकांनी तुला आपल्या प्रेमपाशात आबद्ध केले आहे. त्यामुळे कोणी आम्हाला शंभर, हजार, दहा हजार, लाख, दहा लाख कोटी, दहा कोटीएवढे मूल्य वा मुद्रा दिल्या, तरीही आम्ही तुला सोडावयास तयार नाहीत. ।। ९।।