Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 29

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- गोपवन आत्रेयः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
तं꣡ त्वा꣢ गो꣣प꣡व꣢नो गि꣣रा꣡ जनि꣢꣯ष्ठदग्ने अङ्गिरः । स꣡ पा꣢वक श्रुधी꣣ ह꣡व꣢म् ॥२९॥

त꣢म् । त्वा꣣ । गो꣣प꣡व꣢नः । गि꣣रा꣢ । ज꣡नि꣢꣯ष्ठत् । अ꣣ग्ने । अङ्गिरः । सः꣢ । पा꣣वक । श्रुधी । ह꣡व꣢꣯म् ॥२९॥

Mantra without Swara
तं त्वा गोपवनो गिरा जनिष्ठदग्ने अङ्गिरः । स पावक श्रुधी हवम् ॥

तम् । त्वा । गोपवनः । गिरा । जनिष्ठत् । अग्ने । अङ्गिरः । सः । पावक । श्रुधी । हवम् ॥२९॥

Samveda - Mantra Number : 29
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 3;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (अडिर:) माझे प्राणभूत (अग्ने) ज्ञानसूर्य, जगत्रेता परमात्मन्, (तम्) त्या समस्त गुणांनी युक्त (त्वा) आपणास (गो-पवन) इंद्रियरूप अथवा वाणीरूप गायीचा शोधरू, पवित्रेन्द्रिय पूतवाक् स्तोता (उपासक) अथवा (गोप-वन:) स्वत:च्या अंत:करणात प्रकट करतो. हे (पावक) शुद्धिकर्ता देव, (स:) तो तू (हवम्) माझे हे आवाहक (श्रुधि) ऐक ।।९।।
Essence
परमेश्वर अव्यक्तरूपेण सर्वांच्या हृदयात समाविष्ट आहे. त्याला प्रकट करण्यात तोच मनुष्य समर्थ होतो कीजो पवित्रेन्द्रिय आहे, पवित्र वाक् आहे अथवा आत्मज्ञानी आहे. असा माणूसच वेदमंत्राद्वारे ईश्वराची स्तुती करीत त्याला आपल्या हृदयात व्यक्त करू शकतो. परमेश्वरदेखील अशा हृदयी प्रकट होऊन त्यास पवित्र करतो. ।।९।।
Subject
त्या परमेश्वराला कोण आपल्या हृदयात प्रकट करतो, याविषयी सांगतात. -