Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 285

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- वसिष्ठो मैत्रावरुणिः Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
सु꣣नो꣡त꣢ सोम꣣पा꣢व्ने꣣ सो꣢म꣣मि꣡न्द्रा꣢य व꣣ज्रि꣡णे꣢ । प꣡च꣢ता प꣣क्ती꣡रव꣢꣯से कृणु꣣ध्व꣢꣯मित्पृ꣣ण꣢न्नित्पृ꣢꣯ण꣣ते꣡ मयः꣢꣯ ॥२८५॥

सु꣣नो꣡त꣢ । सो꣣मपा꣡व्ने꣢ । सो꣣म । पा꣡व्ने꣢꣯ । सो꣡म꣢꣯म् । इ꣡न्द्रा꣢꣯य । व꣣ज्रि꣡णे꣢ । प꣡च꣢꣯त । प꣣क्तीः꣢ । अ꣡व꣢꣯से । कृ꣣णुध्व꣢म् । इत् । पृ꣣ण꣢न् । इत् । पृ꣣णते꣢ । म꣡यः꣢꣯ ॥२८५॥

Mantra without Swara
सुनोत सोमपाव्ने सोममिन्द्राय वज्रिणे । पचता पक्तीरवसे कृणुध्वमित्पृणन्नित्पृणते मयः ॥

सुनोत । सोमपाव्ने । सोम । पाव्ने । सोमम् । इन्द्राय । वज्रिणे । पचत । पक्तीः । अवसे । कृणुध्वम् । इत् । पृणन् । इत् । पृणते । मयः ॥२८५॥

Samveda - Mantra Number : 285
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 3; Ardh Prapathak » 2; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 3; Khand » 6;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे मरण धर्मा मनुष्यानो, तुम्ही (सोम पाघ्ने) उपासकांच्या हृदयातील श्रद्धा रसाचे सेवन करणाऱ्या आणि (वज्रिणे) पापी लोकांना दंड देणाऱ्या (इन्द्राय) जगदीश्वराकरिता (सोमम्) श्रद्धारस (सुनोत) अभिषुत करा (गाळा म्हणजे त्याची उपासना करा) तसेच (पक्तीः) ज्ञान, कर्म आदींच्या मिश्रण परिपाक (पचत) करा, (उपासना दृढ करा) (अवसे) जगदीश्वराच्या प्रीतिसाठी (कृणुध्वम् उत) तो श्रद्धारस व ज्ञान, कर्म आदींचा परिपाक त्याला समर्पित करा. (पृणहे) समर्पण करणाऱ्या मनुष्यासाठी तो परमेश्वर (मयः) सुख (पृणन् इत्) अवश्य देतो.।। ३।।
Essence
सुखार्थीजनांनी परमेस्वराविषयी श्रद्धा ठेवावी आणि आपल्या अंतरात्म्यात ज्ञान, कर्म, सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य आदींचा परिपाक अवश्य करावा, हे त्यांच्या हिताचे आहे. ।। ३।।
Subject
इंद्रासाठी सोमरस गाळण्याविषयी प्रेरणा -
Special
या मंत्रात ‘समर्पण करणाऱ्याला सुख मिळते,’ या कथनाने सोम सवन व पाक परिपाक समर्पण रूप कार्याचे समर्थन होत आहे. म्हणून इथे अयन्तिरन्यास अलंकार आहे. ‘सोमं सोम’मुळे लायनुप्रास आणि ‘पृण पृण’मुळे छेकानुप्रास आहे. ।। ३।।