Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 283

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- नृमेध आङ्गिरसः Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
इ꣣त꣢ ऊ꣣ती꣡ वो꣢ अ꣣ज꣡रं꣢ प्रहे꣣ता꣢र꣣म꣡प्र꣢हितम् । आ꣣शुं꣡ जेता꣢꣯र꣣ꣳ हे꣡ता꣢रꣳ र꣣थी꣡त꣢म꣣म꣡तू꣢र्तं तुग्रिया꣣वृ꣡ध꣢म् ॥२८३॥

इ꣣तः꣢ । ऊ꣣ती꣢ । वः꣣ । अजर꣡म्꣢ । अ꣣ । ज꣡र꣢꣯म् । प्रहे꣣ता꣡र꣢म् । प्र । हेता꣡र꣢म् । अ꣡प्र꣢꣯हितम् । अ । प्र꣣हितम् । आशु꣢म् । जे꣡ता꣢꣯रम् । हे꣡ता꣢꣯रम् । र꣣थी꣡त꣢मम् । अ꣡तू꣢꣯र्तम् । अ । तू꣣र्तम् । तुग्रियावृ꣡ध꣢म् । तु꣣ग्रिय । वृ꣡ध꣢꣯म् ॥२८३॥

Mantra without Swara
इत ऊती वो अजरं प्रहेतारमप्रहितम् । आशुं जेतारꣳ हेतारꣳ रथीतममतूर्तं तुग्रियावृधम् ॥

इतः । ऊती । वः । अजरम् । अ । जरम् । प्रहेतारम् । प्र । हेतारम् । अप्रहितम् । अ । प्रहितम् । आशुम् । जेतारम् । हेतारम् । रथीतमम् । अतूर्तम् । अ । तूर्तम् । तुग्रियावृधम् । तुग्रिय । वृधम् ॥२८३॥

Samveda - Mantra Number : 283
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 3; Ardh Prapathak » 2; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 3; Khand » 6;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे मनुष्यानो, (वः) तुम्ही (ऊती) रक्षणासाठी (अजरम्) जो वार्धक्य वा जीर्णव्यापासून दूर अशा (प्रहेतारम्) शुभ कर्म करण्यासाठी प्रेरणा देणारा इंद्र परमेश्वराकडे जा. तुम्ही त्या (अ प्रतिहतम्) अन्य कोणाकडून प्रेरित न होणाऱ्या (म्हणजे जो सर्व शक्तिमान व आत्मनिर्भर आहे) अशा (आशु) शीघ्र कार्य करणाऱ्या म्हणजे व्यर्थचि कार्याला ताटकळत ठेवणाऱ्या आणि (जेतारम्) विजयी (हेतारम्) वृद्धिकारी (रभीकमम्) गतिशील, सूर्य, चंद्र आदी रथांचे वा ब्रह्मांड रूप रथाचे रथी / ईश्वराकडे श्रेष्ठ रथारोही राजाकडे (रक्षणासाठी जा). तुम्ही (अतूर्तम्) ज्याची कोणीही हिंसा करू शकत नाही, अशा (तुप्रिया वृधम्) अन्नात असणार्या रसाचे, आकाशस्त्र मेघजलाचे, वायूचे, यज्ञाद्वारे मिळणारे लाभ देणाऱ्याने, वरिष्ठ जनांच्या धर्माचरणाचे वर्धक अशा इंद्र परमेश्वराला अथवा प्रजाजनांचे उत्कर्ष साधणाऱ्या इंद्र राजाला अभिमुख व्हा, त्याच्या आश्रयास जा.।। १।।
Essence
मनुष्यांनी सांसारिक विषय - विलासाविषयी अती प्रवृत्तीचा त्याग केला पाहिजे आणि विविध गुणागार परमेश्वराचा उपासनेद्वारे अनुकूल करावे. तसेच राजाला प्रजेविषयी अनुकूल करून अभ्युदय आणि निःश्रेयस यांची प्राप्ती करावी. ।। १।।
Subject
परमेश्वराच्या व राजाच्या गुणांचे वर्णन
Special
या मंत्रात श्लेष अलंकार आहे. ङ्गतफ आणि ङ्गरफ या वर्णांची अनेकदा आवृत्ती असल्यामुळे, तसेच ङ्गहारफची तीनदा आवृत्ती असल्यामुळेच ‘तम’ व ‘मतू’मध्ये वृत्त्यनुप्रास अलंकार आहे. ‘प्रहेता’ ‘प्रहित’मध्ये छेकानुप्रास आणि ‘हेतारं’च्या आवृत्तीमध्ये यमक अलंकार आहे. ।। १।।