Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 282

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- मेध्यः काण्वः Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
इ꣢न्द्र꣣ ने꣡दी꣢य꣣ ए꣡दि꣢हि मि꣣त꣡मे꣢धाभिरू꣣ति꣡भिः꣢ । आ꣡ शं꣢तम꣣ शं꣡त꣢माभिर꣣भि꣡ष्टि꣢भि꣣रा꣡ स्वा꣢꣯पे꣢꣯ स्वा꣣पि꣡भिः꣢ ॥२८२॥

इ꣡न्द्र꣢꣯ । ने꣡दी꣢꣯यः । आ । इत् । इ꣣हि । मित꣡मे꣢धाभिः । मि꣣त꣢ । मे꣣धाभिः । ऊति꣡भिः꣢ । आ । श꣣न्तम । श꣡न्त꣢꣯माभिः । अ꣣भि꣡ष्टि꣢भिः । आ । स्वा꣢पे । सु । आपे । स्वापि꣡भिः꣢ । सु꣣ । आपि꣡भिः꣢ । ॥२८२॥

Mantra without Swara
इन्द्र नेदीय एदिहि मितमेधाभिरूतिभिः । आ शंतम शंतमाभिरभिष्टिभिरा स्वापे स्वापिभिः ॥

इन्द्र । नेदीयः । आ । इत् । इहि । मितमेधाभिः । मित । मेधाभिः । ऊतिभिः । आ । शन्तम । शन्तमाभिः । अभिष्टिभिः । आ । स्वापे । सु । आपे । स्वापिभिः । सु । आपिभिः । ॥२८२॥

Samveda - Mantra Number : 282
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 3; Ardh Prapathak » 2; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 3; Khand » 5;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (इन्द्र) परमश्वर, हे राजा, हे विद्वान, तुम्ही (मितमेधाभिः) मेधापूर्ण, कौशल्याने परिपूर्ण अशा तुमच्या (अतिभिः) रक्षणाच्या (उपामा - साधनांसह) (नेदीयः इत्) आमच्या अधिक जवळ या. हे (शन्तम) अतिशय कल्याणकारी परमेश्वर, राजा व विद्वान, तुम्ही (शन्तमाभिः) अतिशय कल्याण करणाऱ्या (अभिष्टिभिः) इच्छित पदार्थांसह (आ) या. हे (स्वापे) सुबंधु, आपण (स्वापिभिः) उत्कृष्ट बंधुभावासह (आ) आम्हा उपासकांकडे / प्रजाजनांकडे / अविद्वानांकडे या. ।। १०।।
Essence
ज्याप्रमाणे परमेश्वराद्वारे उपासकांचे रक्षण बुद्धिपूर्ण रीतीने होते, त्याने दिलेले दान मनुष्यासाठी कल्याणकारी असते आणि त्याचा बंधुभाव शुभ असतो. तद्वत राष्ट्रात राजा आणि विद्वान अध्यापकाचे रक्षण, दान व बंधुत्व सर्वांसाठी शुभ असावे. ।। १०।।
या दशतीमध्ये इंद्र नामाने परमेश्वर, राजा व आचार्य यांच्या गुण- कर्म- स्वभावाचे वर्णन आहे व त्यांच्याजवळ अभयदानाची याचना केली आहे. तसेच सूर्य नावाने त्यांचीच स्तुती केली आहे आणि श्रद्धेचे महत्त्व प्रतिपादित आहे. यामुळे या दशतीतील मंत्राच्या अर्थाची संगती मागील दशतीच्या मंत्र्याशी आहे, असे जाणावे.।।
तृतीय प्रपाठकातील द्वितीय अर्धाची चतुर्थ दशती समाप्त.
तृतीय अध्यातातील पंचम खंड समाप्त.
Subject
इन्द्र नावाने पमरेश्वर, राजा आणि विद्वान यांना आवाहन