Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 279

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- देवातिथिः काण्वः Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
य꣡दि꣢न्द्र꣣ प्रा꣢꣫गपा꣣गु꣢द꣣꣬ग्न्य꣢꣯ग्वा हू꣣य꣢से꣣ नृ꣡भिः꣢ । सि꣡मा꣢ पु꣣रू꣡ नृषू꣢꣯तो अ꣣स्या꣢न꣣वे꣢ऽसि꣢ प्रशर्ध तु꣣र्व꣡शे꣢ ॥२७९॥

य꣢त् । इ꣣न्द्र । प्रा꣢क् । अ꣡पा꣢꣯क् । अ꣡प꣢꣯ । अ꣣क् । उ꣡द꣢꣯क् । उत् । अ꣣क् । न्य꣢꣯क् । नि । अ꣣क् । वा । हूय꣡से꣢ । नृ꣡भिः꣢꣯ । सि꣡म꣢꣯ । पु꣣रू꣢ । नृ꣡षू꣢꣯तः । नृ । सू꣣तः । असि । आ꣡न꣢꣯वे । अ꣡सि꣢꣯ । प्र꣣शर्ध । प्र । शर्द्ध । तु꣡र्वशे꣢ ॥२७९॥

Mantra without Swara
यदिन्द्र प्रागपागुदग्न्यग्वा हूयसे नृभिः । सिमा पुरू नृषूतो अस्यानवेऽसि प्रशर्ध तुर्वशे ॥

यत् । इन्द्र । प्राक् । अपाक् । अप । अक् । उदक् । उत् । अक् । न्यक् । नि । अक् । वा । हूयसे । नृभिः । सिम । पुरू । नृषूतः । नृ । सूतः । असि । आनवे । असि । प्रशर्ध । प्र । शर्द्ध । तुर्वशे ॥२७९॥

Samveda - Mantra Number : 279
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 3; Ardh Prapathak » 2; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 3; Khand » 5;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (इंद्र) जगदीश्वर, (यत्) ज्याअर्थी (प्राक्) पूर्व दिशेत (अपाक्) पश्चिम दिशेत (उदक) उत्तर दिशेत (न्यक् वा) आणि दक्षिण दिशेत (नृभिः) उपासक गण वा स्तोतागण तुझे (हूयसे) आवाहन करतात (हृदयी जागृत होण्यासाठी तुला हाक मारतात) तुझे महिमा गान करतात, त्यामुळे तू (नृषूतः) त्या स्तोतागणाद्वारे प्रेरित व प्रचारित होऊन तू (पुरू) अनेक रूपात (सिमा) सर्वत्र (आनवे) मानव जातीमध्ये (असि) प्रसिद्ध होतोस. (सर्वांना तुझ्या अस्तित्वाची जाणीव होते.( (प्रशर्ध) हे प्रकृष्ट रूपाने शत्रूंना (काम- क्रोधादींना) परास्त करणाऱ्या जगदीश्वरा, तू (तुर्वशे) मार्गात येणाऱ्या विघ्न- बाधांना विभष्ट करणाऱ्या पुरुषार्थी मनुष्यात (त्याच्या हृदयात) त्याला साह्य करण्यासाठी तू (असि) सदा विद्यमान असतोस. ।। ७।।
Essence
आम्ही सर्व दिशांमध्ये, सर्व देश प्रदेशात परमात्म्याचा, त्याच्या विद्यमानतेचा प्रचार केला पाहिजे, तरच मानव जातीचे कल्याण संभवनीय आहे. ।। ७।।
या मंत्रावर भाष्य करताना सायणाचार्याने म्हटले आहे की अनु नावाचा एक राजा होता. त्याचा राजर्षि पुत्र ‘आनव’ होता. तसेच ङ्गतुर्वशफ हेदेखील एका राजाचे नाव आहे. सायणाचे हे व्याख्यान असंगत आहे. कारण सृष्टीच्या आदिकाळात प्रादुर्भूत वेदांमध्ये परवर्ती मानवाच्या इतिहासाचे वर्णन असणे शक्य नाही. निघंटुमध्येही अनु व तुर्वश हे शब्द मनुष्यत्वाची असल्याचा उल्लेख आहे.
Subject
मनुष्य परमेश्वराचे चारही दिशांत आवाहन करीत आहेत -