Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 277

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- देवातिथिः काण्वः Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
अ꣣श्वी꣢ र꣣थी꣡ सु꣢रू꣣प꣢꣫ इद्गोमा꣣ꣳ य꣡दि꣢न्द्र ते꣣ स꣡खा꣢ । श्वा꣣त्रभा꣢जा꣣ व꣡य꣢सा सचते꣣ स꣡दा꣢ च꣣न्द्रै꣡र्या꣣ति स꣣भा꣡मु꣢꣯प ॥२७७॥

अ꣣श्वी꣢ । र꣣थी꣢ । सु꣣रूपः꣢ । सु꣣ । रूपः꣢ । इत् । गो꣡मा꣢꣯न् । यत् । इ꣣न्द्र । ते । स꣡खा꣢꣯ । स । खा꣣ । श्वात्रभा꣡जा꣢ । श्वा꣣त्र । भा꣡जा꣢꣯ । व꣡य꣢꣯सा । स꣣चते । स꣡दा꣢꣯ । च꣣न्द्रैः꣢ । या꣣ति । सभा꣢म् । स꣣ । भा꣢म् । उ꣡प꣢꣯ ॥२७७॥

Mantra without Swara
अश्वी रथी सुरूप इद्गोमाꣳ यदिन्द्र ते सखा । श्वात्रभाजा वयसा सचते सदा चन्द्रैर्याति सभामुप ॥

अश्वी । रथी । सुरूपः । सु । रूपः । इत् । गोमान् । यत् । इन्द्र । ते । सखा । स । खा । श्वात्रभाजा । श्वात्र । भाजा । वयसा । सचते । सदा । चन्द्रैः । याति । सभाम् । स । भाम् । उप ॥२७७॥

Samveda - Mantra Number : 277
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 3; Ardh Prapathak » 2; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 3; Khand » 5;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (इंद्र) दुःखविदारक, सुखदाता, परमेैश्वर्यवान परमेश्वर / राजा / आचार्य (यत्) जेव्हा कोणी (ते) तुमचा (सखा) मित्र होतो. (तुमच्याशी सख्य निर्माण करतो) तेव्हा तो (अश्वी) पुष्कळ अश्वांचा मालक, प्रशस्त मनाचा, प्राण आणि इंद्रियांचा स्वामी बनतो. तो (रथी) प्रशस्त स्थलमाना, जलयान, वायु यानांचा अधिपती / मानव देहरूप रथाचा स्वामी होतो. (सुरूपः) प्रशस्त रूप व गुणांचा स्वामी आणि (गोमान्) गौ, भूमी आणि वाणीचा स्वामी (इत्) अश्वमेष होतो. (सः) तो (सदा) सदा (श्वात्रभाजा) धन, विज्ञान व त्वरित कार्य सिद्धी प्राप्त करतो) तसेच (चन्द्रैः) चंद्राप्रमाणे आल्हादक होऊन तो मनुष्य (सभाम्) प्रजा- सभा, विद्वत्सभा आणि राजसभा या सभांमध्ये (निवडून जातो वा नेमला) जातो. ।। ५।।
Essence
जो माणूस परमेश्वराशी, राजासी वा आचार्याशी मैत्री जोडतो, तो पुरुषार्थी, बलवान, वाण्मी जितेंद्रिय, मेधावी, रथवान, अश्ववान, गोमान, प्राणवान, धनवान, विद्वानवान, कर्मज्ञान, गुणवान आणि आयुष्यात होऊन जनतेचे नेतृत्व करीत जनसभा, विद्वत्सभा आणि राजसभा या सभांमध्ये प्रतिष्ठित होतो, प्रतिष्ठा प्राप्त करतो.।। ५।।
Subject
परमेश्वर, राजा व आचार्यांच्या मैत्रीचे फळ
Special
या मंत्रात श्लेष अलंकार आहे. ।। ५।।