Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 263

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- मेधातिथिः काण्वः Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
स꣣त्य꣢मि꣣त्था꣡ वृषे꣢꣯दसि꣣ वृ꣡ष꣢जूतिर्नोऽवि꣣ता꣢ । वृ꣢षा꣣꣬ ह्यु꣢꣯ग्र शृण्वि꣣षे꣡ प꣢रा꣣व꣢ति꣣ वृ꣡षो꣢ अर्वा꣣व꣡ति꣢ श्रु꣣तः꣢ ॥२६३॥

स꣣त्य꣢म् । इ꣣त्था꣢ । वृ꣡षा꣢꣯ । इत् । अ꣣सि । वृ꣡ष꣢꣯जूतिः । वृ꣡ष꣢꣯ । जू꣣तिः । नः । अविता꣢ । वृ꣡षा꣢꣯ । हि । उ꣣ग्र । शृण्विषे꣢ । प꣣राव꣡ति꣢ । वृ꣡षा꣢꣯ । उ꣣ । अर्वाव꣡ति꣢ । श्रु꣣तः꣢ ॥२६३॥

Mantra without Swara
सत्यमित्था वृषेदसि वृषजूतिर्नोऽविता । वृषा ह्युग्र शृण्विषे परावति वृषो अर्वावति श्रुतः ॥

सत्यम् । इत्था । वृषा । इत् । असि । वृषजूतिः । वृष । जूतिः । नः । अविता । वृषा । हि । उग्र । शृण्विषे । परावति । वृषा । उ । अर्वावति । श्रुतः ॥२६३॥

Samveda - Mantra Number : 263
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 3; Ardh Prapathak » 2; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 3; Khand » 4;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे इन्द्र परमेश्वरा, (सत्यम् इत्था) खरंच, अगदी खरंच तूच (वृषा इत्) ऐश्वर्याची वृष्टी करणारा मेघ (ठासि) आहेस. तूच (वृषजूतिः) विद्युत आदी पदार्थांना मनाच्या वेगाप्रमाणे वेग देणारा आहेस (नः) आम्हा उपासकांचा तूच (अविता) खरा रक्षक आहेस. हे (उग्र) प्रबळ ऐश्वर्यवान, तूच (परावति) उत्कृष्ट मोक्ष लोकात (वृषाहि) निश्चयाने मोक्षातील आनंदाची वृष्टी करणारा आहेस, असे आम्ही (शृण्विषे) ऐकत आहोत आणि (अर्वावति) या इहलोकात देखील तूच (वृषः) धर्म, अर्थ, काम यांच्या आनंदाची वृष्टी करणारे आहात, अशी (श्रृतः) तुमची ख्याती आहे. (तरी आम्हा भक्तांवर आनंदाजी वृष्टी करा)।।१।।
Essence
समस्त गुणगणात जो अग्रणी, इहलोक व परलोकात जो विविध आनंदाची वृष्टी करणारा, अशा परोपकारी त्या परमेश्वराची वंदना आम्ही का करू नये ? अर्थात अवश्य करावी.।।१।।
Subject
परमेश्वराच्या गुणांचे वर्णन
Special
या मंत्रात ‘वृषे वृष, वृषा, वृषो’ या शब्दांमुळे वृत्त्यनुप्रास अलंकार आहे. ‘वृषेदसि‘ ‘तूच मेघ आहेस’ या उक्तीत परमेश्वरावर मेघाचा आरोप केला असल्यामुळे येथे रूपक अलंकारही आहे.।।१।।