Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 260

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- रेभः काश्यपः Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
मा꣡ न꣢ इन्द्र꣣ प꣡रा꣢ वृण꣣ग्भ꣡वा꣢ नः सध꣣मा꣡द्ये꣢ । त्वं꣡ न꣢ ऊ꣣ती꣢꣫ त्वमिन्न꣣ आ꣢प्यं꣣ मा꣡ न꣢ इन्द्र꣣ प꣡रा꣢ वृणक् ॥२६०॥

मा꣢ । नः꣣ । इन्द्र । प꣡रा꣢꣯ वृ꣣णक् । भ꣡व꣢꣯ । नः꣣ । सधमा꣡द्ये꣢ । स꣣ध । मा꣡द्ये꣢꣯ । त्वम् । नः꣣ । ऊती꣢ । त्वम् । इत् । नः꣣ । आ꣡प्य꣢꣯म् । मा । नः꣢ । इन्द्र । प꣡रा꣢꣯ । वृ꣣णक् ॥२६०॥

Mantra without Swara
मा न इन्द्र परा वृणग्भवा नः सधमाद्ये । त्वं न ऊती त्वमिन्न आप्यं मा न इन्द्र परा वृणक् ॥

मा । नः । इन्द्र । परा वृणक् । भव । नः । सधमाद्ये । सध । माद्ये । त्वम् । नः । ऊती । त्वम् । इत् । नः । आप्यम् । मा । नः । इन्द्र । परा । वृणक् ॥२६०॥

Samveda - Mantra Number : 260
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 3; Ardh Prapathak » 2; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 3; Khand » 3;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (इन्द्र) परमैश्वर्यवान परमेश्वर, आचार्य अथवा राजा, आपण (नः) आम्हा/ उपासकांना/ शिष्यांना/ प्रजाजनांना (मा परावृणक्) (निस्सहाय, निराधार) सोडू नका (सधमाधे) जेथे आम्ही एकत्रित सहभावनेने राहत आहोत, त्या घरात/ गुरुकुलात / सभास्थानात वा राष्ट्रात आपण (नः) आमचे (भव) सहाय्यकर्ता व्हा. (त्वम्) आपण (नः) आमच्या (ऊती) रक्षणासाठी सदैव तत्पर रहा. (त्वम् इत्) आपणच (नः) आमचे (आप्यम्) बंधु व्हा. (इन्द्र) हे परमेश्वर, आचार्य, राजा (नः मा परावृणक्) आम्हाला असहाय सोडू नका.।।
येथे पुनरुक्तीमुळे रक्षणाची उत्कट इच्छा व्यक्त होत आहे. निरुक्तकाराने देखील म्हटले आहे की पुनरुक्तीमध्ये फार मोठा अर्थ लुप्त रूपात असतो. यथा एखाद्या अद्भुत वस्तू पाहून द्रष्टाच्या मुखातून न राहता अकस्मात उद्धार निघतात - ‘अहा किती छान. किती छान.’’ (निरुक्त १०/४०)।।८।।
Essence
परमेश्वर, गुरुजन आणि राजा, यांचे यथोचित पूजन, सत्कार करून माणसाने त्यांच्याकडून बहुमोल लाभ मिळविले पाहिजेत.।।८।।
Subject
परमेश्वर, आचार्य आणि राजा यांना प्रार्थना
Special
या मंत्रात श्लेषालंकार आहे।।८।।