Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 255

733 Mantra
Devata- मित्रावरुणादित्याः Rishi- जमदग्निर्भार्गवः Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
प्र꣢ मि꣣त्रा꣢य꣣ प्रा꣢र्य꣣म्णे꣡ स꣢च꣣꣬थ्य꣢꣯मृतावसो । व꣣रूथ्ये꣢३ व꣡रु꣢णे꣣ छ꣢न्द्यं꣣ व꣡चः꣢ स्तो꣣त्र꣡ꣳ राज꣢꣯सु गायत ॥२५५॥

प्र꣢ । मि꣣त्रा꣡य꣢ । मि꣣ । त्रा꣡य꣢꣯ । प्र । अ꣣र्यम्णे꣢ । स꣣च꣡थ्य꣢म् । ऋ꣣तावसो । ऋत । वसो । व꣣रूथ्ये꣢꣯ । व꣡रु꣢꣯णे । छ꣡न्द्य꣢꣯म् । व꣡चः꣢꣯ । स्तो꣣त्र꣢म् । रा꣡ज꣢꣯सु । गा꣣यत ॥२५५॥

Mantra without Swara
प्र मित्राय प्रार्यम्णे सचथ्यमृतावसो । वरूथ्ये३ वरुणे छन्द्यं वचः स्तोत्रꣳ राजसु गायत ॥

प्र । मित्राय । मि । त्राय । प्र । अर्यम्णे । सचथ्यम् । ऋतावसो । ऋत । वसो । वरूथ्ये । वरुणे । छन्द्यम् । वचः । स्तोत्रम् । राजसु । गायत ॥२५५॥

Samveda - Mantra Number : 255
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 3; Ardh Prapathak » 2; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 3; Khand » 3;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(प्रथम अर्थ) (वायूपर) - हे (ऋतावसो) सत्यरूप धनाचे स्वामी मानव, तू (मित्राय) वायूसाटी (अर्यम्णे) आदित्यासाठी आणि (वरूप्ये) शरीररूप घरासाठी लाभदायी अशा (वरुणे) अग्नीकरिता (सचप्यम्) सेवनीय (छन्घम्) छन्दोबद्ध (वचः) स्तुतिवचन (प्र प्र) चांगल्या प्रकारे म्हण, स्तुतिगान कर. हे माझ्या बांधवांनो, तुम्हीदेखील (राजसु) उल्लिखित वायू, आदित्य आणि अग्नीविषयी (स्तोत्रम्) स्तोत्राचे (गायन) गान करा.।।
द्वितीय अर्थ - (प्राणपर) (ऋतातसो) प्राणायामरूप यज्ञालाच मोठी संपदा मानणाऱ्या हे प्राणसाधका, तू (मित्राय) पूरक प्राणासाठी (अर्यम्णे) कुंभक प्राणासाठी आणि (वरूथ्ये) शरीररूप गृहासाठी हितकारी अशा (वरुणाय( रेचक प्राणाविषयी (सचथ्यम्) तसेच एकाच वेळी सर्वांनी वाचन करण्यास योग्य अशा (छन्घम्) छंदोबद्ध रीतीने (वचः) प्राणांचा महिमा स्पष्ट करणारी वचने (प्र प्र) उत्तम प्रकारे उच्चारण करा. हे अन्य प्राणसाधक जनहो, तुम्हीदेखील (राजसु) प्रदीप्त झालेल्या पूर्ववर्णित पूरक, कुंभक व रेचक प्राणांविषयी (स्तोत्रम्) महत्त्व सांगणाऱ्या स्तोत्रांचे (गायत) गान करा।।
प्राणांचे महत्त्व प्रतिपादित करणारे छन्दोबद्ध वेदमंत्र अथर्ववेद (११/४) येथे पहावेत. तिथे म्हटले आहे - ङ्गआत जाणाऱ्या पूरक प्राणशक्तीला आम्ही अनुकूल करावे, बाहेर जाणाऱ्या प्राणाने आमच्या रेचक प्राणाला वश करावे.फफ। (अथर्व ११/४/८)
तृतीय अर्थ - (राष्ट्रपर) - (ऋतावसो) राष्ट्र यज्ञालाच धन मानणाऱ्या हे राष्ट्रभक्त माणका, तू राजारूप इंद्रासह (मित्राय) देश- विदशात मैत्रीचा संदेश विस्तृत करणाऱ्या राज्याधिकाऱ्यासाठी (अर्यम्णे) न्यायाध्यक्षासाठी आणि (वरूथ्ये) सैन्यासाठी हितकारी अशा (वरूणे) शत्रुनिवारक सेनाध्यक्षासाठी (सचप्यम्) सहगान करण्यास योग्य (असे गीत जे सर्वजण मिळून गाऊ शकतील आणि जे (छन्घम्) छंदोबद्ध आहे, असे राष्ट्रगीत (प्र प्र) योग्य प्रकारे (गायत) गा. हे अन्य राष्ट्रभक्त जनहो, तुम्हीदखील (राजसु) पूर्ववर्णित राज्याधिकाऱ्यांविषयी (स्तोत्रम्) त्यांचे गुणवर्णन करणारे स्तोत्र (गीत) गायत) गा।।३।।
Essence
परमेश्वर निर्मित या सृष्टीमध्ये वायू, सूर्य, अग्नी आदी पदार्थ आहेत, त्यांच्या गुण, कर्मांचे वर्णन करीत सर्वांनी यथोचित लाभ प्राप्त केले पाहिजेदत तसेच मानव शरीरात जो प्राण आणि राष्ट्रात जे विभिन्न राज्याधिकारी आहेत, लोकांनी त्यांच्या गुणांचे, कर्मांचे ज्ञान करून घ्यावे आणि त्यापासून आपले हित साधावे.।।३।।
Subject
अर्थात अदितीचे पुत्र मित्र, अर्यमा आणि वरुण हे आहेत -
Special
या मंत्रात श्लेष अलंकार आहे।।३।।