Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 251

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- मेधातिथिर्मेध्यातिथिर्वा काण्वः Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
उ꣢दु꣣ त्ये꣡ मधु꣢꣯मत्तमा꣣ गि꣢र꣣ स्तो꣢मा꣣स ईरते । स꣣त्राजि꣡तो꣢ धन꣣सा꣡ अक्षि꣢꣯तोतयो वाज꣣य꣢न्तो꣣ र꣡था꣢ इव ॥२५१॥

उ꣢द् । उ꣣ । त्ये꣢ । म꣡धु꣢꣯मत्तमाः । गि꣡रः꣢꣯ । स्तो꣡मा꣢꣯सः । ई꣣रते । सत्राजि꣡तः꣢ । स꣣त्रा । जि꣡तः꣢꣯ । ध꣣नसाः꣢ । ध꣣न । साः꣢ । अ꣡क्षि꣢꣯तोतयः । अ꣡क्षि꣢꣯त । ऊ꣣तयः । वाजय꣡न्तः꣢ । र꣡थाः꣢꣯ । इ꣣व ॥२५१॥

Mantra without Swara
उदु त्ये मधुमत्तमा गिर स्तोमास ईरते । सत्राजितो धनसा अक्षितोतयो वाजयन्तो रथा इव ॥

उद् । उ । त्ये । मधुमत्तमाः । गिरः । स्तोमासः । ईरते । सत्राजितः । सत्रा । जितः । धनसाः । धन । साः । अक्षितोतयः । अक्षित । ऊतयः । वाजयन्तः । रथाः । इव ॥२५१॥

Samveda - Mantra Number : 251
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 3; Ardh Prapathak » 2; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 3; Khand » 2;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(उपासक साधनावस्थेत अथवा ब्रह्मलीन अवस्थेतील आपले अनुभव सांगत आहे) (त्ये) ते (मधुत्तमाः) अत्यंत मधुर, प्रिय (सत्राजितः) सत्यजयी तसेच (धनसाः) स्तोताजनाला सद्गुणरूप धन देणारे आणि (अक्षितोतषः) अक्षयरूपेण माझी रक्षा करणारे व (वाजयन्तः) स्तोत्याला आत्मशक्ती प्रदान करणारे (गिरः) परमेश्वराच्या अर्चनेत सहाय्य करणारे (स्तोमासः) माझे स्तोत्र (माझ्या हृदयातील भक्तिभाव आणि स्तुतिपर विचार) माझ्या हृदयात (उद् ईरते) उठत आहेत. कशाप्रकारे ? जसे (रथांः इव) अंतरिक्षात विमानरूप रथ उठतात व उडतात तसे भान माझ्या हृदयात उठत आहेत. (हा या मंत्राचा आध्यात्मिक अर्थ झाला. पुढे दुसरा भौतिक अर्थ असा-) ते विमनरूप रथ (सत्राजितः) एकत्रित शत्रूंनादेखील पराजित करू शकतात (धनसाः) या स्थानावरून त्या स्थानापर्यंत धन आदी पदार्थ नेऊ शकतात. (अक्षितोदषः) रक्षणासाठी हे विमान अक्षय साधन आहेत. (वाजयन्तः) अन्न-धान्यादी पदार्थ देश- देशांतराला पोचविणारे असून (मधुमत्तमाः) अतिशय प्रिय गती असणारे आहेत.।।९।।
Essence
जगदिश्वराचे महिमा - गान करण्यासाठी माझी जिहृा मधुर- मधुर स्तोत्र उठवीत (उच्च स्वराने गात) आहे. कशा प्रकारे ? जसा एक विमान चालक अत्यंत गतिमान विमान यानाला भूमीवरून उंच नेतो आणि अत्यंत उंचीपर्यंत नेतो.।।९।।
Subject
परमेश्वराविषयी माझे स्तोत्र
Special
या मंत्रात रिलष्टोपमा अलंकार आहे.।।९।।