Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 250

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- मेधातिथिर्मेध्यातिथिर्वा काण्वः Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
इ꣣मा꣡ उ꣢ त्वा पुरूवसो꣣ गि꣡रो꣢ वर्धन्तु꣣ या꣡ मम꣢꣯ । पा꣣वक꣡व꣢र्णाः꣣ शु꣡च꣢यो विप꣣श्चि꣢तो꣣ऽभि꣡ स्तोमै꣢꣯रनूषत ॥२५०॥

इ꣣माः꣢ । उ꣣ । त्वा । पुरूवसो । पुरु । वसो । गि꣡रः꣢꣯ । व꣣र्धन्तु । याः꣢ । म꣡म꣢꣯ । पा꣣वक꣡व꣢र्णाः । पा꣣वक꣢ । व꣣र्णाः । शु꣡च꣢꣯यः । वि꣣पश्चि꣡तः꣢ । वि꣣पः । चि꣡तः꣢꣯ । अ꣣भि꣢ । स्तो꣡मैः꣢꣯ । अ꣣नूषत ॥२५०॥

Mantra without Swara
इमा उ त्वा पुरूवसो गिरो वर्धन्तु या मम । पावकवर्णाः शुचयो विपश्चितोऽभि स्तोमैरनूषत ॥

इमाः । उ । त्वा । पुरूवसो । पुरु । वसो । गिरः । वर्धन्तु । याः । मम । पावकवर्णाः । पावक । वर्णाः । शुचयः । विपश्चितः । विपः । चितः । अभि । स्तोमैः । अनूषत ॥२५०॥

Samveda - Mantra Number : 250
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 3; Ardh Prapathak » 2; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 3; Khand » 2;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (पुरुवसो) अत्यंत ऐश्वर्यवान वा अत्यंत निवासक परमेश्वरा, (इमाः उ) या (याः) ज्या (मम) माझ्या (गिरः) वाणी आहेत (माझी प्रार्थना स्तुतिवचने आहेत) त्या (त्वा) तुला म्हणजे तुझ्या महिमेचे (वर्धन्तु) वर्णन करीत आहेत. तुझा महिमा वाढवीत आहेत. (पावकवर्णाः) अग्नीप्रमाणे वर्ण असलेले अथवा तेजस्वी, ब्रह्मवर्चस्वी आणि (शुचयः) पवित्र अंतःकरण असणारे (विप्रश्चितः) विद्वज्जन (स्तोमैः) स्तोत्रांद्वारे (अभि अनूषत) तुझीच स्तुती करीत आहेत. जसे ते विद्वान तुझी स्तुती करताहेत, तसे मीही स्तुती करावी. (हेच माझ्या हिताचे आहे.)।।८।।
Essence
आमचे कर्तव्य आहे की आम्ही स्तुती, प्रार्थना, उपासनेमध्ये परमेश्वराच्या गुणवर्णनासाठी आपल्या वाणीचा उपयोग करावा, तसेच भाषण, उपदेशादीद्वारे त्याच्या अस्तित्वाविषयीच लोकांना सांगावे. यायोगे सर्व लोक आस्तिक व सदाचारी होतील.।।८।।
Subject
परमेश्वरापुढे उपासकाचे निवेदन