Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 249

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- मेधातिथिर्मेध्यातिथिर्वा काण्वः Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
इ꣢न्द्र꣣मि꣢द्दे꣣व꣡ता꣢तय꣣ इ꣡न्द्रं꣢ प्रय꣣꣬त्य꣢꣯ध्व꣣रे꣢ । इ꣡न्द्र꣢ꣳ समी꣣के꣢ व꣣नि꣡नो꣢ हवामह꣣ इ꣢न्द्रं꣣ ध꣡न꣢स्य सा꣣त꣡ये꣢ ॥२४९॥

इ꣡न्द्र꣢꣯म् । इत् । दे꣣व꣡ता꣢तये । इ꣡न्द्र꣢꣯म् । प्र꣣यति꣢ । प्र꣣ । यति꣢ । अ꣣ध्वरे꣢ । इ꣡न्द्र꣢꣯म् । स꣣मीके꣢ । स꣣म् । ईके꣢ । व꣣नि꣡नः꣢ । ह꣣वामहे । इ꣡न्द्र꣢म् । ध꣡न꣢꣯स्य । सा꣣त꣡ये꣢ ॥२४९॥

Mantra without Swara
इन्द्रमिद्देवतातय इन्द्रं प्रयत्यध्वरे । इन्द्रꣳ समीके वनिनो हवामह इन्द्रं धनस्य सातये ॥

इन्द्रम् । इत् । देवतातये । इन्द्रम् । प्रयति । प्र । यति । अध्वरे । इन्द्रम् । समीके । सम् । ईके । वनिनः । हवामहे । इन्द्रम् । धनस्य । सातये ॥२४९॥

Samveda - Mantra Number : 249
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 3; Ardh Prapathak » 2; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 3; Khand » 2;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(इन्द्रम् इत्) इन्द्र नावाच्या त्या जगदिश्वराला आणि सभापती राजाला (देव तातये) विद्वज्जनांच्या कल्याणाकरिता अथवा विद्वान लोक करीत असलेल्या यज्ञाच्या पूर्ततेसाठी आम्ही याज्ञिक / प्रजाजन (हवामहे) आवाहन करतो. (इन्द्रम्) जगदिश्वराला / राजाला (प्रयति) सुरू असलेल्या (अध्वरे) हिंसारहित यज्ञासाठी (हवामहे) (अथवा उपासना- यत्रात ईश्वराचे ध्यान करीत त्याला हृदयात जागृत करीत आहोत) (इन्द्रम्) जगदिश्वराला / राजाला (समीके) देवासुर संग्रामात (आंतरिक युद्ध पापादीविरुद्ध व भौतिक युद्धात विरुद्ध राजाला) (वनिनः) स्तुती, प्रार्थना व ज्ञान प्रकाशमय असलेले आम्ही (हवामेह) हाक देत आहोत. (इन्द्रम्) जगदिश्वराला / राजाला (धनस्य) आध्यात्मिक व भौतिक ऐश्वर्य (सातये) प्राप्तीकरिता (हवामहे) बोलावीत आहोत.।।७।।
Essence
जगात अथवा राष्ट्रात विविध सत्कार्यांच्या यशस्वितेसाठी, विविध ऐश्वर्यांच्या प्राप्तीसाठी मनुष्यांनी / प्रजाजनांनी परमेश्वराचे आणि राजाचे आवाहन मोठ्या श्रद्धेने केले पाहिजे.।।७।।
Subject
इन्द्र नावाने परमेश्वराचे / राजाचे आवाहन
Special
या मंत्रात श्लेष अलंकार आहे. इन्द्र शब्दाची अनेक वेळा आवृत्तीमुळे लाटानुप्रास अलंकार आहे.।।७।।