Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 244

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- मेधातिथि0मेध्यातिथी काण्वौ Chhand- बृहती Swara- मध्यमः Kaand Name- ऐन्द्रं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- ऐन्द्रं पर्व
Mantra with Swara
य꣢ ऋ꣣ते꣡ चि꣢द꣣भिश्रि꣡षः꣢ पु꣣रा꣢ ज꣣त्रु꣡भ्य꣢ आ꣣तृ꣡दः꣢ । स꣡न्धा꣢ता स꣣न्धिं꣢ म꣣घ꣡वा꣢ पुरू꣣व꣢सु꣣र्नि꣡ष्क꣢र्ता꣣ वि꣡ह्रु꣢तं꣣ पु꣡नः꣢ ॥२४४॥

यः꣢ । ऋ꣣ते꣢ । चि꣣त् । अभिश्रि꣡षः꣢ । अ꣣भि । श्रि꣡षः꣢꣯ । पु꣣रा꣢ । ज꣣त्रु꣡भ्यः꣢ । आ꣣तृ꣡दः꣢ । आ꣣ । तृ꣡दः꣢꣯ । स꣡न्धा꣢꣯ता । स꣣म् । धा꣣ता । सन्धि꣢म् । स꣣म् । धि꣢म् । म꣣घ꣡वा꣢ । पु꣣रूव꣡सुः꣢ । पु꣣रु । व꣡सुः꣢꣯ । नि꣡ष्क꣢꣯र्ता । निः । क꣣र्त्ता । वि꣡ह्रु꣢꣯तम् । वि । ह्रु꣣तम् । पु꣢नरि꣡ति꣢ ॥२४४॥

Mantra without Swara
य ऋते चिदभिश्रिषः पुरा जत्रुभ्य आतृदः । सन्धाता सन्धिं मघवा पुरूवसुर्निष्कर्ता विह्रुतं पुनः ॥

यः । ऋते । चित् । अभिश्रिषः । अभि । श्रिषः । पुरा । जत्रुभ्यः । आतृदः । आ । तृदः । सन्धाता । सम् । धाता । सन्धिम् । सम् । धिम् । मघवा । पुरूवसुः । पुरु । वसुः । निष्कर्ता । निः । कर्त्ता । विह्रुतम् । वि । ह्रुतम् । पुनरिति ॥२४४॥

Samveda - Mantra Number : 244
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 3; Ardh Prapathak » 2; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 3; Khand » 2;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
जो (अभिश्रिषः) जोडणारे वा चिटकविणारे पदार्थ - यथा डिंक, सिरस, प्लास्टर आदी पदार्थां (ऋते चित्) शिवाय जो (जत्रुभ्यः) गळ्याच्या हाडापासून (आतृदः) गळा कापला (पुरा) जाण्यापूर्वीच (शत्रूच्या प्रहारामुळे सैनिकाचा गळा अर्धवट कापलेल्या अवस्थेत असतानाच) (सन्धिम्) जोडाच्या अवयवाला त्या कापले गेलेल्या अवयवाशी (सन्धाता) जोडून टाकतो, म्हणजे शस्त्रादीने गळ्याचा एक भाग कापला गेलेला असूनही त्या भागाला नैसर्गिक रूपाने भरून देणअयाची किमया करतो व त्यामुळे गळा धडापासून वेगळा होऊन भूमीवर पडू शकत नाही, तो (पुरुवसुः) अनेक शरीरावयवांना यथास्थान पूर्ववत ठेवणारा (मधवा) वै शल्यचिकित्सारूप धनाचा स्वामी परमेश्वर, जीवात्मा, प्राण अथवा शल्य विशारद (विहृुतम्) वाकडा झालेल्या अवयवाला (पुनः) पुन्हा (निष्कर्ता) दुरुस्त वा जसा असावयास हवा तसे करू शकतो.।।२।।
Essence
अहा ! परमेश्वराचे मानक - शरीर- रचनेचे हे असे चातुर्य केवढे अद्भुत आहे. जोडणाऱ्या साधनांशिवाय डिंक आदी विनादेखील धाव वा कापलेला गळा पुन्हा दृढतेने जोडून येण्याचे कसब त्याने केले नसते. मध्येच स्वयमेव जोडून येण्याचे वा जखम भरून देण्याची व्यवस्था त्याने केली नसती, तर शिर धडापासून वेगळे झाले असते. (वा जखम न भरून येता ते अवयव नासले असते) हेदेखील ईश्वराचेच कर्तृत्व आहे की शरीराचा कोणताही अवयव क्षत- विक्षत वा विकृत झाला तर ईश्वर जीवात्मा व प्राण यांच्या साह्याने आणि शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेमुळे ती जखम वा तो वाकडा अवयव पूर्व स्थितीत येतो. एक निष्णात शल्य शास्त्र विशारददेखील परमेश्वराच्या त्या कर्तृत्वाचेच अनुकरण करीत असतो. युद्धामध्ये शत्रूच्या प्रहारामुळे कोणा सैनिकाच्या गळ्याचा एक भाग कापला गेला, तर शल्यचिकित्सक सुईद्वारे शिवून आणि औषधी लेप करून त्या भागाला निरोग करतो एखाद्या अपघातात जर कोणाचा अवयव वाकडा वा भग्न होतो, तर शल्यविशारद योग्य त्या उपचाराद्वारे तो अवयव नीट करतो.।।२।।
Subject
परमात्मा, जीवात्मा, प्राण आणि शल्य शास्त्रविशारद यांचे कर्तृत्व
Special
या मंत्रात जोडण्याच्या साधनाशिवाय (म्हणजे कारणाशिवाय) जोडणे म्हणजे कार्य करू शकणे, असे वर्णन असल्यामुळे इथे विभावना अलंकार आहे.।।२।।